महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 1 hours ago

ETV Bharat / entertainment

मिथुन चक्रवर्तींचा चित्रपटसृष्टीत दबदबा कायम, जाणून घ्या अभिनेत्याचा प्रेरणादायी प्रवास - Mithun Dadasaheb Phalke Honour

Mithun Dadasaheb Phalke Honour : मिथुन चक्रवर्ती यांना 8 ऑक्टोबर 2024 रोजी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत. मिथुन चक्रवर्ती हे एक प्रसिद्ध अभिनेते असून त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.

Mithun Chakraborty
मिथुन चक्रवर्तीं (संग्रहित छायाचित्र)

मुंबईMithun Dadasaheb Phalke Honour :- दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती चित्रपट सृष्टीत आजही आपला आब राखून आहेत. मिथुन चक्रवर्तींनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट केलेत. विशेष म्हणजे या अभिनेत्याला 8 ऑक्टोबर 2024 रोजी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत. मिथुन चक्रवर्ती हे एक प्रसिद्ध अभिनेते असून, त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. मिथुन चक्रवर्ती यांना पहिल्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'मृगया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेय. हिंदी व्यतिरिक्त मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाली, ओरिया, भोजपुरी, तमीळ, तेलुगू, कन्नड आणि पंजाबी भाषेत 350 हून अधिक चित्रपट केलेय.


कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट: 'डिस्को डान्सर' हा मिथुन चक्रवर्ती यांचा सर्वात हिट चित्रपट! 100 कोटींचा व्यवसाय, हा सध्या जवळपास प्रत्येक मोठ्या बजेटच्या चित्रपटासाठी परवलीचा शब्द झालाय. मात्र 'वर्ल्डवाइड कलेक्शन' च्या बाबतीत हा आकडा पार करण्याचा पहिला मान 'डिस्को डान्सर' कडे जातो. जगभरात 100 कोटी रुपयांची कमाई करणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. बारा वर्षांनंतर म्हणजे 1994 साली प्रदर्शित झालेल्या 'हम आपके है कौन' ने या विक्रमाची बरोबरी केली. एकट्या सोव्हिएट रशियात (रशिया एकसंध असण्याच्या काळात) या चित्रपटाची तब्बल 120 दशलक्ष तिकिटे विकली गेली आणि चित्रपटानं या देशात साठ दशलक्ष रशियन रुबल्सची कमाई केली होती. हा विक्रम 2009 सालच्या 'थ्री इडियटस्' आणि त्यानंतर 2010 साली प्रदर्शित झालेल्या 'माय नेम इज खान' पर्यंत अबाधित राहिला. या चित्रपटातल्या 'जिमी,जिमी...' गाण्याने अवघ्या तरुणाईला भुरळ घातली. 'डिस्को डान्सर' चित्रपटाच्या निमित्ताने 'डिस्को डान्स' हा पाश्चात नृत्यप्रकार मिथुन चक्रवर्ती यांनी घराघरात नेला. आजही 'डिस्को डान्सर' म्हणजे मिथुन हे समीकरण कायम आहे.

पहिला विवाह फक्त 4 महिने टिकला:मिथुन चक्रवर्ती यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक उलथापालथ झालीय. मिथुन चक्रवर्ती यांनी 1979 मध्ये अभिनेत्री हेलेना ल्यूकशी लग्न केलं. पण हे नातं फक्त 4 महिने टिकलं. मिथुन चक्रवर्ती यांचं नाव हिंदी आणि दक्षिणेतल्या चित्रपटसृष्टीतल्या एका मोठ्या अभिनेत्रीबरोबरही जोडलं गेलं होतं. दोघांच्या विवाहाविषयी खूप चर्चा रंगल्या. 'त्या' अभिनेत्रीने हिंदीतल्या एका बड्या निर्मात्याशी संसार थाटल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. हेलेनाशी घटस्फोटानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनेत्री योगिता बालीशी लग्न केलं आणि या दाम्पत्याला 4 मुलं आहेत.

योगितासाठी लग्न सोपं नव्हतं : मिथुन चक्रवर्ती आणि योगिताचे आई-वडील त्यांच्या लग्नावर खुश नव्हते. योगिता घरातील चांगली सून बनू शकेल, याची त्यांना खात्री नव्हती. परंतु योगिताने कुटुंबासाठी खूप मेहनत घेतली अन् कालांतराने कुटुंबीयांनाही योगिता आवडायला लागली. योगिताचा हा दुसरा विवाह होता. योगिताचं ख्यातनाम पार्श्वगायक किशोर कुमार यांच्याशी 1976 साली लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या 3 वर्षांनंतर ते विभक्त झाले. किशोर कुमार यांच्याशी लग्न झालेलं असतानाच योगिताचे मिथुन चक्रवर्तींसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. ही बाब किशोर कुमार यांना कळताच ते संतापले. तेव्हापासून त्यांनी मिथुन चक्रवर्तीच्या कोणत्याही चित्रपटात गाण्यास स्पष्टपणे नकार दिला. किशोरदांचा हा 'मिथुनविरोध' 1989 साली प्रदर्शित झालेल्या 'प्रेमप्रतिज्ञा' पर्यंत राहिला. 'प्रेमप्रतिज्ञा' मध्ये किशोरदांनी मिथुन चक्रवर्ती यांच्यासाठी हिट गाणं दिलं.

मिथुन चक्रवर्ती 327 कोटींच्या संपत्तीचे मालक:मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनेत्री योगिता बालीसोबत लग्न केलेय. कुटुंबाबरोबरच ते राजकारणातही वेळ देत आहेत. अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी काम केले असून, राजकीय पक्षांमध्येही त्यांनी योगदान दिलंय. तसेच मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे मुंबई, उटी, कोलकाता यांसारख्या शहरांमध्ये अनेक मालमत्ता आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे सुमारे 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 327 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

मिथुन चक्रवर्तींकडे 114 श्वान आहेत :मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे 114 श्वान आहेत. त्यांच्या मुंबई आणि उटी येथील बंगल्यात जवळपास 114 श्वान आहेत. मुंबईतील मढ आयलंड येथील त्यांच्या बंगल्यावर 76 तर उटी येथील त्यांच्या बंगल्यावर 38 श्वान आहेत. मुंबईतील त्यांच्या बंगल्यात त्यांनी श्वानांसाठी खास घरही बनवलंय, ज्यामध्ये अनेक आलिशान सुविधा आहेत.

अनेक लक्झरी हॉटेल्सचे मालक :अभिनयासोबतच मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक रिॲलिटी शोचे जज म्हणूनही काम केलेय. हॉटेल इंडस्ट्रीतही त्यांचे नाव आहे. मिथुन चक्रवर्ती चित्रपटांसह व्यवसायांमध्येहीखूप यशस्वी आहेत. मिथुन चक्रवर्ती 'मोनार्क ग्रुप ऑफ हॉटेल्स'चे मालक आहेत. त्यांची उटी, तामिळनाडूतील मसिनागुडी आणि कर्नाटकातील म्हैसूर येथे अनेक आलिशान हॉटेल्स आहेत. मिथुन यांची या हॉटेल्समधून भरपूर कमाई होते. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात मिथुन यांनी एकापाठोपाठ एक चित्रपटांमध्ये काम करण्याचा धडाका लावला होता. प्रत्येक चित्रपट करताना तो चित्रपट उटी येथे चित्रीत व्हायला हवा, अशी प्रमुख अट ते निर्मात्याला घालत. त्याबदल्यात मिथुन यांच्या सलग तारखा आणि त्यांच्याच हॉटेलमध्ये टीमचा मुक्काम असं व्यावसायिक गणित साधलं जात असे. या काळातल्या मिथुन यांच्या चित्रपटांना पांढरपेशा चित्रपटरसिकांनी नाकं मुरडली. मात्र पिटातल्या प्रेक्षकांनी आपल्या लाडक्या मिथुनवर अव्यभिचारी प्रेम कायम ठेवलं.

मिथुन चक्रवर्तींचे 46 कोटींचे घर : अभिनेता मिथुन चक्रवर्ती हे मुंबईतील मड आयलँड परिसरात त्यांचे कुटुंब आणि कुत्र्यांसह आलिशान बंगल्यात राहतात. मड आयलंडमधील या घराची किंमत सुमारे 46 कोटी रुपये आहे. याशिवाय मिथुन चक्रवर्ती यांचे मुंबईतील वांद्र्यात एक आलिशान घर आहे. तसेच मिथुन चक्रवर्ती यांचे उटी येथे एक फार्महाऊस आहे, ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. मिथुन चक्रवर्ती या फार्म हाऊसवर कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी जातात.

मिथुन चक्रवर्तीकडे आलिशान गाड्या :खरं तर कोट्यवधींची संपत्ती असूनही मिथुन चक्रवर्ती यांना अतिशय साधे जीवन जगणे आवडते. मात्र, मिथुन चक्रवर्ती यांना आलिशान कारची खूप आवड आहे. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ, फोर्ड एंडेव्हर, टोयोटा फॉर्च्युनर अशा अनेक गाड्या आहेत. मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक चित्रपटांची निर्मितीही केलीय.

हेही वाचाः

'डिस्को डान्सर'च्या अभिनयसामर्थ्याला सर्वोच्च पुरस्काराची दाद, मिथुन चक्रवर्ती यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर - Dadasaheb Phalke Award

Last Updated : 1 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details