How to Make Coffee Mask : जगातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी कॉफी एक आहे. बहुतांश लोक आपल्या दिवसाची सुरुवात कॉफी पिऊन करतात. कॉफी पिल्यानं मुड फ्रेश तर राहातंच शिवाय कॉफीचा फेस पॅक त्वचा निरोगी ठेवते. कॉफीमध्ये अॅंटी-इंफ्लेमेटरी आणि अॅंटी ऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत. यामुळे सुरकुत्या, मुरुमांचे डाग यासह त्वचेशी निगडीत अनेक समस्या दूर होण्यास मदत होतात. चला तर जाणून घेऊया कॉफीचा फेसमास्क कसा तयार करावा.
फेस मास्क तयार करण्यासाठी आवश्यक घटक
- बारीक ग्राउंड कॉफी पावडर - 2 टीस्पून
- ब्राऊन शुगर - दीड टीस्पून
- ऑलिव्ह तेल - एक टीस्पून
- मध - 1 टीस्पून
- दूध - 1 टीस्पून
विधी : प्रथम एक मिक्सिंग बाऊल घ्या. त्यात वरील सर्व साहित्य टाका आणि पेस्टप्रमाणे मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. साधारणता हे 20 मिनिटे चेहऱ्यावर लाऊन ठेवा. 20 मिनिटांनंतर ते थंड पाण्याने धुवा.
तज्ज्ञांचं म्हणणे आहे की, हा कॉफी स्क्रब लावल्यानं चेहरा मुलायम आणि उजळतो. या कॉफी स्क्रबचा वापर बॉडी स्क्रब म्हणूनही केला जाऊ शकतो. कॉफीमुळे चेहऱ्याचं रक्ताभिसरण सुरळीत होते. कॉफीमध्ये असणाऱ्या सॉफ्टनिंग आणि हायड्रेटिंग गुणधर्मामुळे ड्राय स्किनपासून सुटका मिळते.
कॉफी फेस मास्कचे फायदे
हा फेसमास्क तयार करणं खूप सोपं आहे. शिवाय यामध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्यांमध्ये सौंदर्याची अनेक रहस्ये दडलेली असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
- कॉफीचे गुणधर्म : कॉफीमधील अँटिऑक्सिडंट्स वातावरणातील प्रदूषणाचा त्वचेवर होणारा परिणाम टाळतात. यामुळे आपली त्वचा चमकते. तसंच मुरुमांसोबतच डोळ्यांखालील ब्लॅक स्पॉट देखील कमी होतात, असं तज्ज्ञांचं म्हणणे आहे.
- बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म: तपकिरी साखर फ्लॅकी स्किनची समस्या दूर करते. तसंच हे मृत पेशी देखील काढून टाकते. त्याचे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणि ग्लायकोलिक ॲसिडमुळे त्वचा उजळण्यास मदत होते.
- अँटीबॅक्टेरियल: ऑलिव्ह ऑइल त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणून काम करते. यामध्ये असलेले जीवनसत्त्व 'ए', 'डी', 'ई' आणि 'के' त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे वातावरणातील जीवाणूंच्या प्रभावापासून त्वचेचं संरक्षण करतात, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- मुरुमं कमी करते : मधातील अँटी-मायक्रोबियल गुणधर्म चेहऱ्यावरील मुरुम समस्या दूर करते, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मधामध्ये मृत पेशी, सुरकुत्या आणि चेहऱ्यावरील रेषा कमी करण्याची शक्ती असल्याचेही म्हटलं जाते.
- लवचिकता वाढवण्यासाठी: कोरड्या त्वचेला सुखदायक बनवण्यात दूध पहिल्या क्रमांकावर आहे. दुधात असलेले व्हिटॅमिन ए यासाठी मदत करते. यातील व्हिटॅमिन डी चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि रेषा कमी करते आणि त्वचेची लवचिकता वाढवते, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)