कानपूर IND vs BAN 2nd Test Day 4 : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील कानपूर कसोटी सामन्याचा आज (30 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारतीय संघानं पहिला डाव 9 बाद 285 धावांवर घोषित केला. भारतानं तुफानी खेळ करत अवघ्या 34.4 षटकांत या धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे भारताला 52 धावांची आघाडी मिळाली. प्रत्युत्तरात बांगलादेशचा दुसरा डाव सुरु आहे. बांगलादेशची धावसंख्या 26 धावा आहे आणि त्यांच्या 2 विकेट पडल्या आहेत. सध्या शदमान इस्लाम आणि मोमिनुल हक क्रीजवर आहेत. अजून बांगलादेश भारतापेक्षा 26 धावांनी मागे आहे. आता या कसोटीचा पाचवा दिवस निर्णायक ठरणार आहे.
That's Stumps on Day 4 in Kanpur!
— BCCI (@BCCI) September 30, 2024
Stage set for an action-packed final day of Test cricket ⏳
Bangladesh 26/2 in the 2nd innings, trail by 26 runs.
Scorecard - https://t.co/JBVX2gz6EN#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/bbpsdI2jaJ
सामन्यात पावसाचा व्यत्यय : या सामन्यात पावसाचा व्यत्यय पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवशी पावसानं तर तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळं मैदान ओलं झालं होतं एकही चेंडू टाकला गेला नाही. तर खराब प्रकाश आणि पावसामुळं पहिल्या दिवशी केवळ 35 षटकंच खेळता आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटी सामना 280 धावांनी जिंकला. यात रविचंद्रन अश्विनने अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केली होती. यासह भारत या मालिकेत 1-0 नं पुढं आहे.
Make that two for #TeamIndia and R Ashwin 🔥🔥
— BCCI (@BCCI) September 30, 2024
Hasan Mahmud is O.U.T for 4.
Live - https://t.co/JBVX2gyyPf#INDvBAN | @IDFCFIRSTBank https://t.co/V7H8eD28gm
बांगलादेशच्या दुसऱ्या डावात आतापर्यंत काय झालं : दुसऱ्या डावात बांगलादेशची सुरुवात खराब झाली. पाहुण्या संघानं 18 धावांवर झाकीर हसनची विकेट गमावली. झाकीर आर. अश्विनच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. झाकीरनं 15 चेंडूंचा सामना करत 10 धावा केल्या. त्यानंतर अश्विननं नाईटवॉचमन म्हणून आलेल्या हसन महमूदलाही (4) स्वस्तात बाद केलं. यानंतर शादमान इस्लाम आणि मोमिनुल हक यांनी चौथ्या दिवशी आपल्या संघाचं आणखी नुकसान होऊ दिलं नाही.
पाचवा दिवस ठरणार निर्णायक : आता सामन्याचा पाचवा दिवस निर्णायक ठरणार आहे. सध्या बांगलादेश भारताच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या 26 धावांनी मागे आहे. आता शेवटच्या आणि पाचव्या दिवशी भआरत बांगलादेशचा दुसरा डाव लवकर संपुष्टात आणून सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल तर बांगलादेश पुर्ण धिवस खेळपट्टीवर तग धरुन सामना अनिर्णित राखण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा :