मुंबई - Nita Ambani Miss World 2024 : रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी मिस वर्ल्ड 2024 इव्हेंटमध्ये पारंपरिक बनारसी साडी नेसल्यामुळे चर्चेत आल्या आहे. स्वदेशी डिझाइन केलेल्या साडीचा प्रत्येक धागा सोकी झारी आणि रेशमपासून बनविण्यात आला आहे. नीता अंबानींच्या साडीवर सुंदर फुलांची जाळी, मीनाकारी नक्षी काळजीपूर्वक विणलेली आहे. त्यामुळे ती साडी खूप आकर्षक दिसत होती. ही साडी कुशल कारागीर मोहम्मद इस्लाम डिझाइननं केली आहे. अनेकदा मनीष मल्होत्रा हे भारतीय कलात्मकतेचे प्रतिनिधित्व आणि सुंदर कपड्याचे नेहमीच सादरीकरण करत असतात.
नीता अंबानींची बनारसी साडी : नीता अंबानी यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात नीता अंबानी यांनी उपस्थित सर्व महिलांचं कौतुक केलं. नीतानं आपल्या भाषणात म्हटलं, 'या सन्मानाबद्दल धन्यवाद. हा केवळ माझ्या एकट्याचा सन्मान नाही. तर आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या करुणा आणि सेवेच्या सामर्थ्याचा दाखला आहे. माझ्या संपूर्ण प्रवासात मला सत्यम, शिवम् आणि सुंदरम् या शाश्वत भारतीय तत्त्वांचे मार्गदर्शन मिळालं आहे. रिलायन्स फाऊंडेशनमध्ये, आम्ही प्रत्येक भारतीय विशेषत: महिला आणि तरुण मुलींना शिक्षण, आरोग्यसेवा, क्रीडा उपजीविका आणि कला आणि संस्कृतीच्या संवर्धनाद्वारे सक्षम करण्यासाठी समर्पित प्रयत्न करत आहोत. मी कृतज्ञतेनं आणि नम्रतेनं हा पुरस्कार स्वीकारते.''