ETV Bharat / technology

आलिशान BMW कारऐवजी डॉ. मनमोहन सिंग यांना आवडाची 'ही' कार?, अंगरक्षकानं सांगितला किस्सा - MANMOHAN SINGH

डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असूनही त्यांना नेहमीच मध्यमवर्गीय व्यक्तीसारखं राहणं आवडायचं. त्यांना पंतप्रधान असतानाही बीएमडब्ल्यूसारख्या आलिशान कारऐवजी मारुती 800 कार आवडायची.

Dr Manmohan Singh
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी पोलीस अधिकारी असीम अरुण (Asim Arun X Account)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : 16 hours ago

हैदराबाद : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालंय. त्यांच्या निधनानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. योगी सरकारमधील मंत्री आणि माजी पोलीस अधिकारी असीम अरुण यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र, त्यांनी श्रद्धांजली वाहताना, त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक किस्सा शेअर केला आहे, ज्यामध्ये मनमोहन सिंग यांचा साधेपणा देखील दिसून येतो. असीम एकेकाळी मनमोहन सिंग यांच्या एसपीजी टीममध्ये बॉडीगार्ड होते.

असीम अरुण यांची पोस्ट वर : "मैं 2004 से लगभग तीन साल उनका बॉडी गार्ड रहा। एसपीजी में पीएम की सुरक्षा का सबसे अंदरुनी घेरा होता है - क्लोज़ प्रोटेक्शन टीम जिसका नेतृत्व करने का अवसर मुझे मिला था। एआईजी सीपीटी वो व्यक्ति है जो पीएम से कभी भी दूर नहीं रह सकता। यदि एक ही बॉडी गार्ड रह सकता है तो साथ यह बंदा होगा। ऐसे में उनके साथ उनकी परछाई की तरह साथ रहने की जिम्मेदारी थी मेरी।"

"साहब की अपनी एक ही कार थी. मारुति 800, जो पीएम हाउस में चमचमाती काली बीएमडब्ल्यू के पीछे खड़ी रहती थी। मनमोहन सिंह जी बार-बार मुझे कहते- असीम, मुझे इस कार में चलना पसंद नहीं, मेरी गड्डी तो यह है (मारुति)। मैं समझाता कि सर यह गाड़ी आपके ऐश्वर्य के लिए नहीं है, इसके सिक्योरिटी फीचर्स ऐसे हैं जिसके लिए एसपीजी ने इसे लिया है। लेकिन जब कारकेड मारुति के सामने से निकलता तो वे हमेशा मन भर उसे देखते। जैसे संकल्प दोहरा रहे हो कि मैं मिडिल क्लास व्यक्ति हूं और आम आदमी की चिंता करना मेरा काम है। करोड़ों की गाड़ी पीएम की है, मेरी तो यह मारुति है।"

1996 मॉडेल मारुती 800 : मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनमोहन सिंग यांच्याकडं 1996 मॉडेल मारुती 800 होती. त्यांनी त्यांच्या संपत्तीच्या यादीत या मॉडेलचा उल्लेख केला आहे. 1986 ते 1997 दरम्यान, मारुती 800 च्या टॉप व्हेरिएंटची त्यावेळी एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.66 लाख ते 1.88 लाख रुपये होती. या कारमध्ये 796cc चं पेट्रोल इंजिन होतं. हे इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशनसह येत होतं. या कारचं मायलेज 14kmpl ते 16.1kmpl पर्यंत आहे. या 5 सीटर कारची लांबी 3335 मिमी, रुंदी 1440 मिमी आणि व्हीलबेस 2175 मिमी होती.

'हे' वाचलंत का :

  1. Kia Syros SUV भारतात सादर : इंजिनसह, किंमत, फीचर आले समोर, बुकिंग कधी होणार सुरू?
  2. चॅटजीपीटी 'सर्च' संवेदनाक्षम, वापरकर्त्यांना देऊ शकतं चुकीची माहिती
  3. रिलायन्स जिओचा धमाका..! फक्त 601 मध्ये अमर्यादित 5G डेटाचा वार्षिक प्लॅन लाँच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.