मुंबई - Mirzapur Season 3 teaser out : बहुचर्चित वेब सीरीज मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची प्रत्येकजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. 'मिर्झापूर' आणि 'मिर्झापूर 2'च्या धमाक्यानंतर आता 'मिर्झापूर सीझन 3' देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. या क्राईम थ्रिलर सीरीजच्या तिसऱ्या सीझनची रिलीज तारीख आज 11 जून रोजी जाहीर करण्यात आली आहे. प्राइम व्हिडिओवर 'मिर्झापूर सीझन 3' कधी रिलीज होईल याबद्दल सांगण्यात आलं आहे. 'मिर्झापूर सीझन 3' 5 जुलै रोजी प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल, अली फजल, श्वेता त्रिपाठी, विजय वर्मा आणि हर्षिता गौर स्टारर 'मिर्झापूर 3' पुन्हा एकदा आता चर्चेत आहे.
'मिर्झापूर 3'चा टीझर रिलीज :'मिर्झापूर 3'मध्ये नवीन चेहरे दिसणार असल्याचं बोललं जात आहे. एक्सेल एंटरटेनमेंट 2022 पासून 'मिर्झापूर 3'वर काम करत आहे. 'मिर्झापूर 3 'च्या निर्मात्यांनी सोशल मीडिया टीझर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये काही नवीन चेहरे दिसत आहे. याशिवाय टीझरमध्ये थरारक सीन पाहायला मिळत आहे. टीझर पोस्टच्या कॅप्शनमध्ये निर्मात्यांनी लिहिलं, "जंगल में भौकाल मचने वाला है! 'मिर्झापूर 3' प्राईमवर, 5 जुलाई." मिर्झापूर 3' मध्येही नवे चेहरे दिसणार असल्याचं बोललं जात आहे. 'मिर्झापूर 3' वेब सीरीज यावेळी मुन्ना भैयाची भूमिका साकारणारा दिव्येंदू शर्मा दिसणार नाही.