मुंबई - Chiranjeevi Guinness World Record :तेलुगू मेगास्टार चिरंजीवी यांनी रविवार, 22 सप्टेंबर रोजी इतिहास रचला आहे. मेगास्टार चिरंजीवी यांना सर्वात यशस्वी चित्रपट स्टार म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट अभिनेता आणि नर्तक म्हणून ओळखले जाते. दरम्यान बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानच्या हस्ते चिरंजीवी यांचा सन्मान करण्यात आला आहे. चिरंजीवी यांनी 1978 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. हैदराबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात चिरंजीवी यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं गौरव करण्यात आला.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड: आमिर खाननं हा सन्मान चिरंजीवी यांना देत असताना मिठी मारली. चिरंजीवी यांच्या उत्कृष्ट नृत्य कौशल्याचं कौतुक करताना आमिरनं म्हटलं, "तुम्ही त्यांचे कोणतेही गाणे पाहिल्यास आपल्याला दिसून येते की, त्यांचं मन नृत्यात चांगलं रमलं आहे. ते आनंदानं नृत्य करतात. आपल्या नजरा त्यांच्यावर असतात. आम्ही त्याच्यापासून खूप प्रभावित आहोत. पुढं त्यानं म्हटलं , "मी इथे येऊन खुश आहे. त्यांनी खूप यश मिळवलं आहे. तुम्हाला तुमच्या या प्रवासामध्ये आणखी यश मिळेल. आम्ही नेहमीच तुमची प्रशंसा करण्यासाठी उपस्थित राहू." यानंतर चिरंजीवी यांनी आपल्या भाषणात म्हटलं, "गिनीज रेकॉर्डबद्दल कधीही आशा नव्हती."