महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

वरुण धवन स्टारर 'बेबी जॉन' गाण्यावर किशोरी शहाणेचा धमाकेदार डान्स व्हिडिओ व्हायरल - BABY JOHN SONG VIDEO GOES VIRAL

मराठी अभिनेत्री किशोरी शहाणेचा डान्स व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा डान्स व्हिडिओ अनेकांना पसंत पडला आहे.

kishori shahane
किशोरी शहाणे (kishori shahane - instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 11, 2024, 5:00 PM IST

मुंबई -मराठी सिनेसृष्टीत सुंदर अभिनेत्री किशोरी शहाणे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती आपले सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आता सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडिओ तिनं शेअर केला आहे. यामध्ये ती धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. किशोरी शहाणेचा हा व्हिडिओ आता तिच्या चाहत्यांना आवडत असून अनेकजण तिचे कौतुक करत आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीझनमध्ये झळकल्यानंतर किशोरी अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकली होती. सध्या ती 'कैसे मुझे तुम मिल गए' या मालिकेसाठी काम करत आहे. 'कैसे मुझे तुम मिल गए'मध्ये किशोरी बबिता आहुजाचं पात्र साकरत आहे.

किशोरी शहाणेचा जबरदस्त डान्स :किशोरी शहाणेनं हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'नैन मटक्का', सावलीत कोणालाही नाचण्यासाठी सोप्या स्टेप धन्यवाद.' या व्हिडीओमधील किशोरीची एनर्जी जोरदार आहे. किशोरीनं वरुण धवन स्टारर आगामी चित्रपट 'बेबी जॉन'मधील 'नैन मटक्का' गाण्यावर सुंदर डान्स केला आहे. दरम्यान किशोरीच्या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओच्या कमेंट विभागात लिहिलं, 'किशोरीताई एकच नंबर.' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, 'खूपच धमाकेदार डान्स करत आहात, मला पण तुम्ही शिकवू शकता का ?' आणखी एका चाहत्यानं लिहिलं, 'वा ताई वा छान.' याशिवाय अनेकजण या व्हिडिओवर फायर आणि हार्ट इमोजी शेअर करत आहेत.

किशोरी शहाणेचं वर्कफ्रंट : दरम्यान किशोरी काही दिवसांपूर्वी तिच्या मुलाबरोबर आशिष शेलार यांनी आयोजित केलेल्या पार्टीत गेली होती. यानंतर तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. किशोरी शहाणेनं अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'जदुबई जोरत', 'चंगु मंगू', 'प्रेम करुया खुल्लम खुल्ला', 'वाक्या', 'माझा पती करोडपती', 'जीवन संध्या', 'वाजवा रे वाजवा', 'राम रहिम' अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहेत. याशिवाय तिनं अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details