मुंबई -Mannara Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण मन्नारा चोप्रानं 'जिद' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. मन्नारा चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. आता मन्नारा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिनं पहिल्यांदाच जिममध्ये पाऊल ठेवलं आहे. मन्नारानं सांगितलं की तिनं जिममध्ये पदार्पण केलंय. मन्नारानं जिममधून वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत ती जांभळ्या रंगाच्या जिम आउटफिटमध्ये वर्कआउट करताना दिसत आहे.
मनारा चोप्रा बद्दल : मन्नारानं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जिममधून केलेल्या वर्कआउटचा व्हिडिओ शेअर करत लिहिलं, "जिममध्ये पदार्पणात स्वागत आहे." मन्नारा तिच्या जिम आउटफिटमध्ये खूप बोल्ड दिसत आहे. तिचा हा जिम लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. मन्नाराच्या म्हणण्यानुसार, तिनं यापूर्वी कधीही जिममध्ये वर्कआउट केलेलं नाही. तसेच आता तिच्या या व्हिडिओच्या पोस्टवर अनेकजण कमेंट करून तिचं कौतुक करताना दिसत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "मन्नारा तुझा हा लूक खूप सुंदर आहे, थोडी बारीक झाल्यावर आणखी चांगली दिसणार." दुसऱ्या एकानं लिहिलं, "मन्नारा मेकअपशिवाय चांगली दिसते." आणखी एकानं लिहिलं, "मन्नारा तू खूप सुंदर दिसत आहेत." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.