मुंबई - Ramoji Rao Demise :साऊथ अभिनेता विजय सेतुपतीचा 'महाराजा' चित्रपट 50वा आहे. यानिमित्त पत्रकार परिषद नुकतीच चेन्नई येथील प्रसाद स्टुडिओ, साळीग्राम येथे पार पडली. हा चित्रपट निथिलन समीनाथन यांनी दिग्दर्शित केला आहे. पेसन स्टुडिओनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दरम्यान रामोजी ग्रुपचे संस्थापक दिवंगत रामोजी राव यांचं 8 जून रोजी निधन झालं. आज 9 जून रोजी रामोजी फिल्म सिटीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. विजय सेतुपती 'महाराजा' चित्रपटाची पत्रकार परिषद सुरू असताना मौन राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मंचावर बोलताना विजय सेतुपती म्हटलं, "रामोजी राव यांच्या निधनानं खूप दुःख झालं. मी त्यांना जवळून ओळखत नव्हतो. पण मी 'पुडुपेट' या चित्रपटासाठी रामोजी फिल्मसिटीमध्ये गेलो होतो.
विजय सेतुपती केला शोक व्यक्त :पुढं त्यानं सांगितलं, "त्याच्या सेटवर सर्व काही आहे. तिथे हिल रिज, एअरपोर्ट, शूटिंगसाठी लागणारे सर्व काही पाहिला मिळेल. चित्रपट बनवण्यासाठी तिथे राहणेही सोपे होते. तिथे कशाचेही टेन्शन नाही. मी रामोजी राव यांच्या काही सेटवर देखील झोपलो आहे. रामोजी फिल्म सिटीमधून मला खूप काही शिकायला मिळाले. त्याचा मृत्यू अत्यंत वेदनादायक आहे. त्यांनी खूप लोकांच्या कल्पनेला आकार दिला, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो." रामोजी राव यांच्या निधनावर साऊथपासून ते बॉलिवूडपर्यंतच्या स्टार्सनी शोक व्यक्त केला आहे. अल्लू अर्जुन, रजनीकांत, राम चरण, एसएस राजामौली, कंगना रणौत, रितेश-जेनेलिया देशमुख, पीएम मोदी, एन चंद्राबाबू नायडू यांसारख्या सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करून पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.