मुंबई - Malaika Arora :बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या सौंदर्य आणि लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा ती तिच्याविषयी अपडेट शेअर करत असते. मलायका अरोरा सध्या स्पेनमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. तिच्या बीच व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अलीकडेच, तिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो पाहिल्यानंतर लोकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. फोटोमध्ये तिच्या जवळ भरपूर खाद्यपदार्थ आणि एक मिस्ट्री मॅनही दिसत आहे. आता अनेकजण हा फोटो पाहिल्यानंतर ती नात्यात असल्याच्या चर्चा करत आहे.
मलायकाच्या आयुष्यात पुन्हा प्रेम फुललं ? : मलायका पुन्हा कोणालातरी डेट करत आहे आणि ती त्या व्यक्तीबरोबर सुट्टी देखील साजरी करत आहे. अर्जुन कपूरबरोबरच्या ब्रेकअपनंतर मलायकाच्या आयुष्यात पुन्हा प्रेम फुलले आहे. तिच्या आयुष्यात एका व्यक्तीनं प्रवेश केल्याचं बोललं जात आहे. मलायकानं शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा हा स्पष्ट दिसत नाही. मात्र हा व्यक्ती पांढऱ्या शर्टमध्ये असल्याचं दिसत आहे. मलायका स्वादिष्ट पदार्थाबरोबर समुद्राच्या सौंदर्याचा आनंद घेत आहे. आता या सुंदर क्षणामध्ये ती एकटी नसून तिच्याबरोबर मिस्ट्री मॅन आहे.