मुंबई - Maidaan Passed by CBFC :अभिनेता अजय देवगण आणि प्रियामणी स्टारर स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट 'मैदान' रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 10 एप्रिल रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. दरम्यानं, सेन्सॉर बोर्डानं 'मैदाना'ला कोणतीही कट न करता ग्रीन सिग्नल दिला आहे. आता या चित्रपटाचा रनटाइमही समोर आला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला अजय देवगणच्या चित्रपटात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाला यूए (U/A )प्रमाणपत्र दिलं आहे. याशिवाय त्यांनी एक डिस्क्लेमर जोडण्याचा आदेश दिला आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ''मैदान हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून काल्पनिक आहे, यात दिग्गज फुटबॉल खेळाडू तसेच काल्पनिक घटक आणि लेखकांचे संशोधन यांचा समावेश आहे.
'मैदान' चित्रपटाचा रणटाइम :याशिवाय चित्रपटामध्ये कोणतेही पात्र सिगारेट ओढताना दाखवले गेले तर, तेथे धूम्रपान विरोधी टिकर लावण्यात यावं. चित्रपटाचा रनटाइम 3 तास 1 मिनिट आणि 30 सेकंद आहे. 'मैदान' या चित्रपटात अजय देवगण फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीमची भूमिका साकारत आहे. अजय देवगणच्या वाढदिवशी 2 एप्रिल रोजी 'मैदान' या चित्रपटाचा अंतिम ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री प्रियामणी अजयच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'मैदान' हा भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटामध्ये त्यांच संघर्ष दाखवण्यात येणार आहे.