मुंबई :महाशिवरात्रीचा सण प्रत्येक शिवभक्तासाठी विशेष असतो. लोक या दिवशी महादेवाची पूजा करतात आणि उपवास करतात. महाशिवरात्री संगीताशिवाय अपूर्ण आहे. संगीताबरोबर भक्तीचा आनंद द्विगुणित होतो. बॉलिवूडमध्ये अशी अनेक गाणी आहेत, जी शिवभक्तांना खूप पसंत असेल. आज आम्ही विशेष दिवशी तुमच्यासाठी अशी 5 बॉलिवूड गाणी घेऊन आलो आहोत, जी महाशिवरात्री उत्सवाची मजा द्विगुणित करतील.
जय जय शिवशंकर :'वॉर' चित्रपटातील 'जय जय शिवशंकर' हे गाणे खूपच लोकप्रिय झालं आहे. या गाण्यात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हे दोन स्टार्स आहेत. हे गाणे खूप दमदार आहे. हृतिक आणि टायगर यांनी या गाण्यात धमाकेदार डान्स केला आहे. या महाशिवरात्रीला, हे गाणे तुमच्या प्लेलिस्टमध्ये समाविष्ट तुम्ही करू शकता. तसेच 'जय जय शिवशंकर' हे शीर्षक जुन्या गाण्याचं आहे. हे गाणं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलं आहे. या गाण्यात राजेश खन्ना आणि मुमताज हे कलाकार आहेत. हे गाणं 'आप की कसम' चित्रपटातील आहे.
नमो नमो : सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान यांच्या 'केदारनाथ' चित्रपटातील 'नमो नमो' हे गाणे अनेकांच्या आवडीचं आहे. हे गाणं इतके पसंत केले जात आहे की, आजकाल बहुतेक लोकांच्या कॉलर ट्यून आणि रिंगटोनवर हेच आहे. हे गाणं शिव भक्ती आज ऐकू शकतात.