महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

निक्की-अरबाजमध्ये जवळीकता वाढल्यानं 'ही' व्यक्ती नाराज, थेट सोशल मीडियावर केली पोस्ट - BOSS MARATHI 5 PROMO VIRAL - BOSS MARATHI 5 PROMO VIRAL

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5'मध्ये आता अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहे. आता सोशल मीडियावर एक प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरातून अंकिता वालावलकर बाहेर पडताना दिसत आहे. याशिवाय निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलमध्ये जवळीकता वाढत आहे. यामुळे अरबाजची गर्लफ्रेंड त्याच्यावर नाराज असल्याचं दिसत आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2024, 1:20 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi 5 :सध्या छोट्या पडद्यावर सर्वाधिक चर्चेत असलेला 'बिग बॉस मराठी 5' शो आहे. हा शो प्रेक्षकांना खूप आवडत आहे. दरम्यान बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकरला बाहेर पडावे लागणार आहे. अंकिताला मानकाप्याच्या टास्कमध्ये नॉमिनेट करण्यात आलं होतं. या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद असताना देखील तिला घरातून जावं लागत असल्याचं एक प्रोमोमध्ये दाखविण्यात आलं आहे. याशिवाय आणखी एक प्रोमो बिग बॉस निर्मात्यांनी शेअर केला आहे. यामध्ये घरात नॉमिनेट करण्याची प्रकिया सुरू असल्याचं दिसत आहे.

बिग बॉस मराठी 5'चा नवीन प्रोमो : प्रोमोमध्ये असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या सदस्याला नॉमिनेट करण्याचा बिग बॉसचा आदेश आहे. यानंतर धनंजय पोवार हा प्रोमोत बोलताना दिसतो, "तिला खेळामधील समज नाही." यानंतर जान्हवी किल्लेकर म्हणते, "तो दुसऱ्याच्या डोक्यांनी चालत असतो." यानंतर अभिजीत सावंत म्हणतो, "तुला स्वत:चं मत आहे का ?" तसेच अरबाज पटेल प्रोमोत म्हणतो, "समोरून गेम खेळत नाही." यानंतर अनेकजण निक्की तांबोळीला गद्दार असल्याचं म्हणताना दिसतात. तसेच शेवटी धनंजय हा घनश्याम दरवडेला खडेबोल सुनावताना दिसतो. या प्रोमोमध्ये घरातील सदस्य एकमेंकावर चिखलफेक करताना दिसत आहेत.

अरबाजची गर्लफ्रेंड नाराज : दरम्यान या शोमधील अनेक गोष्टी प्रेक्षकांना खटकत आहे. यातील एक गोष्ट म्हणजे निक्की आणि अरबाजमधील जवळीकता आहे. या दोघांमधील नातं खरं की खोटं हेच प्रेक्षकांना समजलं नाही. अरबाज हा एका रिलेशनशिपमध्ये असताना, तो निक्कीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान अरबाजच्या गर्लफ्रेंडची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये लीझा बिंद्रानं स्वतःचा एक सेल्फी पोस्ट केला आहे, त्यावर लिहिलंय, "प्लीज मला अरबाजबद्दल मेसेज आणि कमेंट करू नका." तिनं अरबाजचं नाव लिहित फॉलोअर्सला विनंती केली आहे. 'बिग बॉस मराठी 5'चा नवा सीझन सुरू होऊन आता 36 दिवस उलटले आहेत. आता या शो आणखी काय होईल, हे पाहण्याकरिता अनेकजण उत्सुक आहेत.

हेही वाचा :

  1. बिग बॉसच्या घरातील सदस्यांना 'भाऊचा धक्का' नव्हे 'शॉक', नव्या प्रोमोनं वाढली उत्सुकता - bigg boss marathi
  2. 'बिग बॉस मराठी 5'च्या घराला मिळाला नवीन कॅप्टन, जाणून घ्या कोण? - Bigg Boss Marathi
  3. अभिजीत सावंत निक्की तांबोळीच्या बिग बॉसमधील गेममुळे नाराज, जोडीला जाणार तडा? - abhijeet sawant likely break jodi

ABOUT THE AUTHOR

...view details