मुंबई- निर्माती आणि दिग्दर्शिका किरण रावचा 'लापता लेडीज' हा सोशल कॉमेडी ड्रामा चित्रपट यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने 'लापता लेडीज'चा ऑस्करमध्ये समावेश करण्याची घोषणा केली आहे. आमिर खानची माजी पत्नी किरण रावचा हा चित्रपट चालू वर्षी प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाचा सहनिर्माता आमिर खान आहे. किरण राव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'लापता लेडीज'ची ऑस्करमध्ये परदेशी भाषा कॅटेगरीसाठी निवड झाली आहे. आता मार्च 2025 मध्ये 97 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात याची पुढील घोषणा केली जाईल. 'लापता लेडीज' चित्रपटानं ऑस्करच्या शर्यतीत एक-दोन नव्हे तर 28 उत्तम चित्रपटांना मागे टाकत बाजी मारली आहे.
'लापता लेडीज' या चित्रपटानं भारतात यावर्षी प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांना मागं टाकलंय यामध्ये रणबीर कपूरचा अॅनिमल, प्रभासचा कल्की 2898 एडी, विक्रमचा तमिळ चित्रपट तंगलान, राजकुमार रावचा श्रीकांत, तामिळ चित्रपट वाझाई आणि मल्याळम चित्रपट उल्लोझुक्कू इत्यादी महत्त्वाच्या चित्रपटांचा समावेश होता.
काय आहे लापता लेडीज चित्रपटाची कथा?
या चित्रपटाची कथा शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या एका मुलीवर आधारित आहे. या मुलीच्या इच्छे विरोधात तिचे कुटुंबीय तिला लग्न करण्यास भाग पाडतात. लग्नानंतर, ही मुलगी पतीसह ट्रेनने तिच्या सासरी जात असताना डोक्यावरील लांब बुरख्यामुळे चुकीच्या व्यक्तीबरोबर उतरते. त्याच वेळी ट्रेनमधून प्रवास करणारी आणखी एक नववधू या गोंधळात अडकते. नववधूंची झालेली अदलाबल यामुळे कथा रंजक बनते आणि महत्त्वाचा संदेश प्रेक्षकांना देत अंजन घालण्याचा प्रयत्न करते.
'लापता लेडीज' या चित्रपटाची साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये बनलेल्या उल्लोझुक्कू, थंगलान आणि वजाहाई चित्रपटासह श्रीकात, अॅनिमल यासारख्या तगड्या चित्रपटांशी टक्कर होती. यातील काही महत्त्वाच्या चित्रपटाबद्दल माहिती घेऊयात.
उल्लोझुक्कू
21 जून 2024 रोजी रिलीज झालेल्या उल्लोझुक्कू हा चित्रपट खऱ्या कथानकावर आधारित आहे. या चित्रपटाची कथा एका कुटुंबाभोवती फिरते. हे कुटुंब त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या मृतदेहाला दफन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु पुराच्या पाण्यामुळे ते करू शकत नाहीत. अशा विषय असलेला हा चित्रपट दक्षिणेच्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
श्रीकांत
श्रीकांत हा आंध्र प्रदेशातील उद्योगपती श्रीकांत बोला यांच्या सत्य कथेवर आधारित चित्रपट आहे. श्रीकांत अंध असून त्याला अभ्यासाची खूप आवड असते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रीकांतने लोकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून आपले स्वप्न पूर्ण केले. श्रीकांतच्या वडिलांची इच्छा होती की त्याने क्रिकेटर व्हावे, पण जेव्हा त्यांना समजले की त्यांचा मुलगा अंध आहे, तेव्हा त्यांचे स्वप्न भंगतं. दिव्यांग श्रीकांतला अंध असल्यामुळे आयआयटीमध्ये प्रवेश मिळत नाही, पण अमेरिकेची एमआयटी त्याला प्रवेश मिळतो. येथून शिक्षण घेतल्यानंतर श्रीकांत आपली स्वप्ने सत्यात उतरवतो. राजकुमार रावने या चित्रपटात उद्योगपती श्रीकांत बोला यांची उत्तम भूमिका साकारली आहे.
थंगलान
तमिळ सुपरस्टार विक्रम स्टारर चित्रपट थंगलान हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. चित्रपटाची कथा कोलार सोन्याच्या खाणीभोवती गुंफण्यात आली आहे. राजा चोल आणि टिप सुलतान यांनी कोलारच्या जमीनीतून सोने काढण्याचा प्रयत्न केला तेव्हाची ही कथा आहे. यानंतर इंग्रजांनी ती जागा ताब्यात घेतली. या जागेत सोनं असल्याचा शोध थंगलान हा आदिवासी समुहाचा नायक लावतो. पण त्या काळात असलेली जातीव्यवस्था, संरजामी अन्यायी यंत्रणा यामुळे थंगलानला कराव्या लागलेल्या संघर्षाची ही अनोखी कथा आहे. पा रंजीत यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
वजाहाई
वजाहाई हा मारी सेल्वाराज यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला तमिळ मुलांचा ड्रामा चित्रपट आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारने याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 23 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज झाला. या चित्रपटाची कथा हरवलेल्या मुलांवर आधारित आहे. ही कथा चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या आयुष्याशी संबंधित आहे. या मुलांना कच्च्या केळीचे घड कापावे लागतात आणि ते लॉरीमध्ये आणावे लागतात, यासाठी त्यांना प्रति घड 1 रुपये दिले जातात. चित्रपटाची कथा 1998 च्या काळातील आहे.
लापता लेडीजने ऑस्करच्या शर्यतीत या चित्रपटांना मागे टाकले
1. हिंदीतील 11 चित्रपट
अॅनिमल
किल
श्रीकांत
चंदू चॅम्पियन
जोराम
मैदान
सॅम बहादूर
आर्टीकल 370
छोटा भीम