मुंबई : आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावचा चित्रपट 'लापता लेडीज' ऑस्कर 2025 मध्ये आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. 'लापता लेडीज' यावर्षी 1 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची अनेकांनी प्रशंसा केली. 4 ऑक्टोबर रोजी 'लापता लेडीज' हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित झाला. यापूर्वी जपानमध्ये प्रभासच्या 'सालार' आणि शाहरुख खानच्या 'पठाण'नं जोरदार कमाई केली होती. आता या चित्रपटांचे रेकॉर्ड 'लापता लेडीज'नं तोडला आहे. 'लापता लेडीज' जपानमध्ये रिलीज होऊन 45 दिवस झाले आहेत.
'लापता लेडीज'ची जपानमध्ये जोरदार कमाई :या चित्रपटानं 45 दिवसांमध्ये ¥50M+ कमाई केली आहे. यासह 'लापता लेडीज' हा जपानमधील सर्वाधिक कमाई करणारा 14वा चित्रपट ठरला आहे. आता 'लापता लेडीज'नं जपानच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर पठाण (¥50M) आणि साऊथ स्टार प्रभास अभिनीत 'सालार पार्ट 1 :सीजफायर'चा रेकॉर्ड मोडल्यावर, आणखी दुसऱ्या विक्रम करण्याच्या मार्गावर आहे. 'लापता लेडीज'नं भारतात 24 कोटी आणि जगभरात 27 कोटीची कमाई केली आहे. 'लापता लेडीज' हा चित्रपट आता जपानमधील प्रेक्षकांना आवडत आहेत.
'पठाण' आणि 'सालार' मागे टाकले :'लापता लेडीज' आता जपानी बॉक्स ऑफिसवर 'बाहुलबली - द बिगिनिंग' (¥75.69M) रेकॉर्ड तोडू शकतो. 'लापता लेडीज' या यादीत 13 वे स्थान मिळवेल असं सध्या दिसत आहे. दरम्यान जपानमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'आरआरआर' पहिल्या क्रमांकावर आहे.
जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट
1. आरआरआर (तेलुगु) – ¥2.42B
2. मुथु (तमिळ) – ¥405M
3. बाहुबली 2: द कन्क्लूजन (तेलुगु) – ¥305M
4. 3 इडियट्स (हिंदी) – ¥170M
5. इंग्लिश-विंग्लिश (हिंदी) – ¥160M