महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'मडगाव एक्सप्रेस'मधून दिग्दर्शनात पदार्पण कसे झाले याचा कुणाल खेमूने केला खुलासा - कुणाल खेमू

Kunal Khemu directorial debut : अभिनेता कुणाल खेमु 'मडगाव एक्सप्रेस' या चित्रपटामधून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. त्यानेच लिहिलेल्या या कथानकाचं दिग्दर्शन त्यानं का स्वीकारलं याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे.

Kunal Khemu
मडगाव एक्सप्रेस

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 10:16 AM IST

मुंबई - Kunal Khemu directorial debut : 'कलयुग', 'गो गोवा गॉन', 'गोलमाल' फ्रेंचाइजी आणि 'मलंग' यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा कुणाल अभिनेता कुणाल खेमू आता कॅमेऱ्याच्या लेन्सच्या मागे काम करत आहे. कुणालने दिव्येंदू, प्रतीक गांधी आणि अविनाश तिवारी यांच्या भूमिका असलेल्या 'मडगाव एक्स्प्रेस' या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची भूमिका पार पाडली आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत कुणालने दिग्दर्शक म्हणून नवीन जबाबदारी स्वीकारण्याबाबत खुलासा केला आहे. तो म्हणाला, " मी कधीच विचार केला नव्हता की या चित्रपटाचं दिग्दर्शन मी करावं. या चित्रपटाला रोमँटिक बनवायचां काम करत होतो आणखी फार काही नाही. मला लिहायला आवडतं, त्यामुळे मी जेव्हा याची स्क्रिप्ट लिहिली तेव्हा मी यात फक्त अभिनय करावा असं वाटलं होतं. पण ही स्क्रिप्ट जेव्हा इतरांनी वाचली तेव्हा ते म्हणाले की तू ही कथा वेगळ्या पद्धतीनं लिहिली आहेस. त्यामुळे तूच ती बनवावीस परंतु ही गोष्ट मी इतकी गांभीर्यानं घेतली नव्हती. आता मी याचं दिग्दर्शन केल्यानंतर खूप खूश आहे...मला खूप मजा आली."

मंगळवारी कुणालने चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग केले. या ट्रेरमध्ये तीन तरुण मुले दाखवली आहेत, जे गोव्यात सुट्टी घालवण्याचे स्वप्न पाहतात. त्यांचे स्वप्न सत्यात उतरते पण लवकरच ते स्वप्न एका दुःस्वप्नात बदलते कारण ते तीन मित्र, आता मोठे झाले आहेत. आपला स्वप्नातला गोवा पाहण्यासाठी ते मडगाव एक्स्प्रेसने रेल्वेने प्रवास करतात आणि हाच प्रवास त्यांनी न विचार केलेल्या जगात त्यांना घेूऊन जातो.

या चित्रपटात नोरा फतेही, उपेंद्र लिमये आणि छाया कदम हे देखील कॉमेडी ड्रामाचा एक भाग आहेत. नोरानेही या चित्रपटातील तिच्या अनुभवाबद्दल स्पष्टपणे सांगितले.

नोरा फतेहीने एएनआयला सांगितले, "मला खूप मजा आली. आमची ऑफ-सेट केमिस्ट्री खरोखरच चांगली होती. मी कुणाल आणि दिव्येंदू यांच्याकडून खूप काही शिकलो. ते अत्यंत प्रतिभावान आहेत. तसेच, कुणाल एक हुशार दिग्दर्शक आहे."

ऑगस्ट 2022 मध्ये, कुणालने इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्याच्या दिग्दर्शकीय पदार्पणाची घोषणा केली होती. सोशल मीडियावर ही घोषणा करताना त्याने लिहिले, "गणपती बाप्पा मोरया! सर्व चांगल्या गोष्टी त्याच्या नावाने सुरू होतात म्हणून मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस विचार करू शकत नाही. माझ्या डोक्यात एका विचाराने सुरुवात झाली, हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी माझ्या बोटातून माझ्या लॅपटॉपवरील शब्दांत, आणि आता ते रुपेरी पडद्यावर प्रत्यक्षात येत आहे. माझ्या स्क्रिप्टवर आणि माझ्या दृष्टीवर विश्वास ठेवल्याबद्दल आणि माझ्यासोबत भागीदारी केल्याबद्दल रितेश सिद्धवानी, फरहान अख्तर यांचे खूप खूप आभार. सिनेमाच्या दुनियेतील रोमांचक प्रवास. हात जोडून आणि डोके टेकवून मी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेत आहे. सादर करत आहे मडगाव एक्सप्रेस," असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते.

'मडगाव एक्स्प्रेस' 22 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी याची निर्मिती केली आहे.

हेही वाचा -

  1. प्रतीक गांधी दिव्येंदू अविनाश तिवारी स्टारर 'मडगाव एक्सप्रेस' ट्रेलर प्रदर्शित
  2. अदा शर्मा स्टारर 'बस्तर: द नक्सल स्टोरी'चा ट्रेलर झाला रिलीज
  3. अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये थिरकलेल्या सेलेब्रिटींवर कंगना रणौतचा हल्ला बोल

ABOUT THE AUTHOR

...view details