मुंबई :सुंदर डोळ्यांनी आणि हास्यामुळे व्हायरल झालेली महाकुंभ मेळ्यामधील मोनालिसाचे नशीब आता चमकले आहे. एका रात्रीत सोशल मीडिया सेन्सेशन बनल्यानंतर, मोनालिसा स्टार बनली आहे. आता ती आपल्याला रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. तिला एका चित्रपटासाठी साईन करण्यात आलं आहे. पूर्वी रुद्राक्षाची माळ विकणारी मोनालिसा आता नायिका म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल. दरम्यान मोनालिसा कुंभमेळ्यात माळ विकत होती, मात्र तिला 15 दिवसांमध्ये कुंभ सोडावा लागला, कारण ती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यानंतर तिला माळ विकण्यात खूप त्रास झाला. लोक तिच्याभोवती कॅमेरे घेऊन फिरू लागले होते. यानंतर तिला मध्य प्रदेशातील महेश्वरला परत जावं लागलं होतं.
कुंभमेळ्यात माळ विकणारी व्हायरल गर्ल मोनालिसाला चित्रपटाची मिळाली ऑफर, दिग्दर्शकानं शेअर केली पोस्ट - VIRAL GIRL MONALISA
कुंभमेळ्यात माळ विकणारी व्हायरल गर्ल मोनालिसाला एक चित्रपट ऑफर झाला आहे. आता ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
![कुंभमेळ्यात माळ विकणारी व्हायरल गर्ल मोनालिसाला चित्रपटाची मिळाली ऑफर, दिग्दर्शकानं शेअर केली पोस्ट monalisa](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/30-01-2025/1200-675-23434933-thumbnail-16x9-kumbh-mela-2025.jpg)
By ETV Bharat Entertainment Team
Published : Jan 30, 2025, 2:08 PM IST
मोनालिसा कुठल्या चित्रपटात दिसणार :आता मोनालिसाला एक चित्रपट ऑफर झाला आहे. तिनं हा चित्रपट साईन केला आहे. दरम्यान दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी त्यांच्या 'द डायरी ऑफ मणिपूर' या चित्रपटात मोनालिसाला कास्ट केल्याची माहिती दिली आहे. सनोज मिश्रा यांनी स्वत: मोनालिसाच्या गावी जाऊन तिची भेट घेतली होती. 'द डायरी ऑफ मणिपूर' या चित्रपटात मोनालिसा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी तिला मुंबईत अभिनयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
दिग्दर्शक सनोज मिश्रानं शेअर केली पोस्ट :सनोज मिश्रा त्यांनी आपल्या पोस्टवर लिहिलं, 'मी चित्रपटात मोनालिसाला चांगल्या प्रकारे सादर करेन. मला मोनालिसाचे भविष्य चित्रपटांमध्ये घडवायचे आहे. मी तिच्या कुटुंबातील सदस्यांनाही भेटलो, ते सर्व खूप निष्पाप लोक आहेत. मोनालिसा कठोर परिश्रम करण्यास तयार आहे. ती अजूनही लहान आहे, तिला तयार करण्याची जबाबदारी आपली आहे.' दरम्यान या चित्रपटाचे शूटिंग मणिपूर, दिल्ली आणि लंडनमध्ये होणार आहे. 8 फेब्रुवारीपासून लंडनमध्ये शूट केलं जाईल. या चित्रपटात मोनालिसाबरोबर अभिनेता राजकुमार रावचा मोठा भाऊ, अमित राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच दिग्दर्शक आणि अभिनेता महेंद्र लोधी आणि अनुप जलोटा सारखी मोठी नावे देखील या चित्रपटाबरोबर जोडली जात आहेत. 'द डायरी ऑफ मणिपूर' चित्रपटात, मणिपूरमधील स्थानिक कलाकार सहभागी होतील. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाचं बजेट 20 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.