मुंबई - laapataa ladies and oscar :चित्रपट निर्माता किरण राव यांच्या 'लापता लेडीज'नं 2024-25 ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश केला. आपला चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करेल, हे चित्रपट निर्मात्याचं स्वप्न असतं. आता हे किरण रावचं स्वप्न पूर्ण झालं आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया सर्वोत्कृष्ट चित्रपटाची निवड करेल, असेही किरणनं एका संवादरम्यान सांगितलं होतं. 97 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट श्रेणीसाठी 2024-25 ऑस्करसाठी 'लापता लेडीज'नं प्रवेश केल्यानंतर आता किरण रावही आनंदी असल्याचं दिसत आहे. यापूर्वीदेखील अभिनेता आणि निर्माता आमिर खानचा 'लगान'देखील ऑस्करसाठी भारताकडून पाठविण्यात आला होता. मात्र, त्यावेळी भारताला ऑस्करनं हुलकावणी दिलं होती. दुसऱ्यांदा आमिर खान निर्माता असलेला चित्रपट ऑस्करसाठी जाणार आहे.
'लापता लेडीज'ची ऑस्करमध्ये एन्ट्री : फिल्म फेडरेशन ऑफ इंडियानं 97 व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून 'लापता लेडीज'चं नाव घोषणा केलं असून आता या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहेत. अनेकजण किरण राव यांचं अभिनंदन करत आहेत. किरण राव दिग्दर्शित, 'लापता लेडीज' सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. इतर उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटांसह प्रतिष्ठित सन्मान मिळविण्यासाठी हा चित्रपट भारताकडून प्रयत्न करताना दिसेल. भारतात आधीच धुमाकूळ घालणारा हा चित्रपट आता ऑस्करकडे वळला आहे.