मुंबई - Kiara Advani : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'योद्धा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सिद्धार्थनं त्याच्या 'योद्धा' चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं आहे. हा चित्रपट 15 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. 'योद्धा' चित्रपट सिद्धार्थची पत्नी म्हणजेच कियारा अडवाणीनं पाहिला आहे. तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा रिव्ह्यू दिला आहे. कियारानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एका महिला चाहत्याचा व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला आहे. यामध्ये सिद्धार्थ आपल्या स्टाईलमध्ये चालताना दिसत आहे.या पोस्टच्या क्लिपमध्ये चाहत्याने लिहिले की ''माझ्या आवाजावर जाऊ नको. मी खूप भावूक झाले आहे.'' यानंतर कियारानं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "हाहा सेम बेब सेम." ही पोस्ट आता प्रचंड व्हायरल होत आहे.
कियारा अडवाणीनं शेअर केली पोस्ट : 'योद्धा' चित्रपटामध्ये दिशा पटानी आणि साऊथ अभिनेत्री राशी खन्ना यांनी दमदार अभिनय केला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी स्टार्स आणि सिद्धार्थच्या कुटुंबीयांना दाखवण्यात आला होता. या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. फिल्म प्रीव्ह्यूदरम्यान कियाराही तिथे पोहोचली. तिनं संपूर्ण चित्रपट पाहिला होता. यानंतर तिनं आपली प्रतिक्रिया दिली होती. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा एका सैनिकाच्या भूमिकेत आहे. 'योद्धा' चित्रपटाचे दिग्दर्शन सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांनी केलंय.