मुंबई - Kiara Advani and Sidharth Malhotra : अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. ही जोडी अनेकांना खूप आवडते. काही दिवसांपूर्वीच हे जोडपे मुंबई विमानतळावर दिसले होते. आता या जोडप्याचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये ते त्यांच्या मित्र आणि मैत्रीणींबरोबर दिसत आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे फोटो यांच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आले आहेत. आता हे व्हायरल झालेले फोटो, या जोडप्याच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत. फोटोमध्ये कियारा आणि सिद्धार्थ त्यांच्या मित्रांबरोबर पोझ देताना दिसत आहे.
सिद्धार्थ आणि कियाराचं लूक : सिद्धार्थच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तो शॉर्ट्स आणि डेनिम शर्टमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. दुसरीकडे कियारा हिरव्या रंगाच्या प्रिंटेड वन पीसमध्ये खूप देखणी दिसत आहे. कियारा आणि सिद्धार्थ अनेकदा सुंदर फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. या दोन स्टार्सच्या प्रोफेशनल लाईफबरोबर त्यांच्या पर्सनल लाईफही खूप चर्चेत असते. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी राजस्थानमध्ये 7 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नगाठ बांधली. या जोडप्याचं लग्न खूप चर्चेत होतं. या जोडप्याची प्रेमकहणी 'शेरशाह' चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. हा चित्रपट अनेकांना आवडला होता. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता.