मुंबई- सुपरस्टार श्रीदेवीच्या निधनाच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त, तिची मुलगी खुशी कपूरने त्यांच्या कौटुंबिक अल्बममधील एक हृदयस्पर्शी आठवण शेअर केली. खुशीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या लहानपणाचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती तिची बहीण जान्हवी कपूर आणि आई मिळून कॅमेऱ्याला पोज देताना दिसत आहे.
श्रीदेवी आता आपल्यात नसली तरी तिचे चाहते आजही तिला आपल्या हृदयात जपून ठेवतात. तिच्या सिनेमांपासून तिच्या स्टाइलपर्यंत तिची उपस्थिती कौतुकाचा विषय राहिली आहे. जान्हवी आणि खुशी या दोघीही अनेकदा अशा खास प्रसंगी त्यांच्या आईची झलक शेअर करत असतात. त्यामुळे ती लोकांच्याही कायम स्मरणात राहात असते. आज श्रीदेवीच्या पुण्यतिथीनिमित्त, खुशीने तिची दिवंगत आई आणि बहीण जान्हवीसह टिपलेला एक मौल्यवान क्षण शेअर केला आहे.
स्नॅपशॉटमध्ये, श्रीदेवी पारंपारिक पोशाखात तेजस्वी दिसत आहे. मोरपंखी निळ्या रंगाच्या साडीत ती नीटनीटक्या केशरचनेसह कपाळावर सिंदुर लावला आहे. फोटोत ती मुलींसोबत स्मितहास्य करताना दिसत आहे.
सुंदर गुलाबी पोशाख परिधान केलेल्या छोट्या जान्हवी आणि खुशी, आई श्रीदेवीसह फोटोची सुंदरता वाढवताना दिसतात. हा खरोखरच एक मौल्यवान क्षण आहे जो चाहत्यांच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करु शकेल.
24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबई येथे एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी गेलेली असताना श्रीदेवीचे निधन झाले. तिचे लग्न निर्माता बोनी कपूर यांच्याशी झाले होते आणि या दांपत्याला जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत.
1963 मध्ये श्री अम्मा यंगर अय्यपन म्हणून जन्मलेल्या, श्रीदेवीने 'चांदनी', 'मिस्टर इंडिया', 'लम्हे' आणि 'इंग्लिश विंग्लिश' यांसारख्या चित्रपटांमधील संस्मरणीय अभिनयामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील तिच्या प्रतिष्ठित भूमिकांसाठी प्रसिद्ध होत्या. तमिळ, तेलुगु, मल्याळम, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्येही तिने तिच्या उत्तम कामामुळे कायमची छाप सोडली. 'मॉम' या तिच्या शेवटच्या चित्रपटाने तिला मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.
हेही वाचा -
- कथित लव्हबर्ड्स रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडाची आशिष रेड्डीच्या रिसेप्शनला स्टाईलमध्ये एन्ट्री
- शाहरुखची कन्या सुहाना खानने अलिबागमध्ये खरेदी केली ९.५ कोटी रुपयांची जमीन
- बॉलिवूडमधील डार्क वेब अॅक्टिव्हिटीवर कंगना रणौतचा घणाघाती आरोप