मुंबई - लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित बहुप्रतीक्षित 'छावा' कोणतंही विघ्न न येता १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. यातील विकी कौशलनं साकारलेल्या भूमिकेचं सध्या खूप कौतुक सुरू आहे. पतीची भूमिका पाहिल्यानंतर अभिनेत्री कॅटरिना कैफनं तिच्या सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. छावाची संपूर्ण टीम आणि चित्रपटाबद्दल कॅटरिनानं आपलं मत व्यक्त केलं आहे.
कॅटरिना कैफची छावाबद्दलची पोस्ट - कॅटरिना कैफला 'छावा' चित्रपट खूप आवडला आहे. तिनं सोशल मीडियावर याविषयी एक पोस्ट लिहिली आहे. कॅटरिनानं छावाचं पोस्टर शेअर करत लिहिलं की, "छत्रपती संभाजी महाराजांचं महात्म्य दाखवण्यारा किती सिनेमॅटिक अनुभव होता.. लक्ष्मण उतेकर यांनी ही कथा इतकी उत्तम प्रकारे दाखवली आहे. मी तर पूर्णपणे नि:शब्द झाले आहे, चित्रपटातील शेवटचे ४० मिनिटे तुम्हाला थक्क करतील. चित्रपट पाहिल्यानंतर, मी माझी संपूर्ण सकाळ विचारात घालवली की मला हा चित्रपट पुन्हा पहायचा आहे. विकी कौशल, तू खरोखरच खूप प्रतिभावान आहेस, जेव्हा जेव्हा तू पडद्यावर येतोस तेव्हा प्रत्येक शॉट अद्भुत असतो. तू पात्रापमध्ये कसा रुपांतरीत होतोस हे आश्चर्यचकित करणारं आहे. मला तुझा आणि तुझ्या प्रतिभेचा खूप अभिमान आहे. आता मी दिनेश विजनबद्दल काय सांगणारा, तुम्ही खरे दूरदर्शी आहात, तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता त्याच्या पाठीशी ठाम राहता. छावामधील सर्व कलाकार उत्तम आहेत आणि मला संपूर्ण टीमचा अभिमान आहे."