मुंबई - Kartik Aaryan: बॉलिवूडमध्ये 'प्रेम' हे नाव ऐकताच प्रत्येकाच्या मनात सलमान खानची प्रतिमा समोर येते. सलमान खाननं सूरज बडजात्याच्या अनेक चित्रपटांमध्ये प्रेमाची भूमिका साकारली आहे. आता सूरज बडजात्या हे बॉलिवूडला नवीन 'प्रेम' देणार आहेत. सूरज बडजात्या कार्तिक आर्यनला त्याच्या पुढच्या चित्रपटात कास्ट करू शकतात. रिपोर्टनुसार, सूरज बडजात्याला त्यांच्या आगामी प्रोजेक्ट 'प्रेम की शादी'मध्ये सलमान खानला कास्ट करायचं होतं. मात्र, सलमान खाननं करिअरच्या या टप्प्यात रोमँटिक चित्रपट करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सूरज बडजात्या त्यांच्या आगामी चित्रपटात कार्तिकला कास्ट करण्याचा विचार करत आहेत.
सूरज बडजात्याच्या आगामी चित्रपट : या चित्रपटाबाबत सूरज बडजात्यानं कार्तिक आर्यनशी बोलणं सुरू केलंय. सूरज बडजात्या एका अभिनेत्याच्या शोधात आहे जो पडद्यावर निरागसता आणू शकेल. कार्तिक आर्यनचा चेहरा निरागस असल्यानं ते या चित्रपटाची ऑफर त्याला देऊ शकतात. दरम्यान कार्तिक आर्यनचा चित्रपट 'चंदू चॅम्पियन' लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. कार्तिक त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सतत व्यग्र आहे. या चित्रपटाची कहाणी पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. 'चंदू चॅम्पियन' चित्रपटात त्याच्याबरोबर कतरिना कैफ, श्रद्धा कपूर,विजय राज, राजपाल यादव आणि इतर कलाकार असणार आहेत. हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे.