मुंबई - Kartik Aaryan Chandu Champion: हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता कार्तिक आर्यननं त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. चित्रपटातील मराठी संवाद बोलण्यासाठी आणि बोली भाषा शिकण्यासाठी त्यानं 14 महिन्यांचे प्रशिक्षण घेतलं, असल्याचं सांगण्यात येत आहे. कार्तिकनं चित्रपटासाठी 14 महिने मराठी बोलीवर लक्ष केंद्रित केलं होतं. त्याच्याकडे एक शिक्षक होता ज्यानं त्याला भाषेवर चांगली पकड मिळवण्यास मदत केली. कार्तिकनं त्याच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रिलीज केला होता. या फर्स्ट लूकमध्ये त्याची हेअरकट लहान केसांची होती. याशिवाय त्यानं इंडियाचा ब्लेझर घातला होता. तसेच त्याच्या चेहऱ्यावर जखमांचे व्रण देखील दिसत होते.
'चंदू चॅम्पियन' चित्रपटासाठी कार्तिकनं घेतली मेहनत :'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट 14 जून 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं आहे. जानेवारी 2024 मध्ये त्यांनी 'चंदू चॅम्पियन'चे शूटिंग पूर्ण झालं असून या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर, कतरिना कैफ, पलक लालवानी, राजपाल यादव, भुवन अरोरा, विजय राज आणि इतर कलाकार दिसणार आहे. कार्तिकनं या चित्रपटासाठी वर्षभर साखर देखील खाल्ली नव्हती. शुटिंग पूर्ण केल्यानंतर त्यानं रसमलाई खाल्ली होती. याचा व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावर देखील शेअर केला होता. एक वर्षाहून अधिक कडक तयारी आणि जगभरात 8 महिने रात्रंदिवस शूटिंग केल्यानंतर आता हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.