महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कार्तिक आर्यनचे वर्षभरानंतर तोंडगोड, 'चंदू चॅम्पियन'च्या पॅकअपनंतर केला खुलासा - कार्तिक आर्यन

Kartik Aaryan : कार्तिक आर्यननं कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' या आगामी चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले आहे. त्यानं सेटवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शुटिंग पूर्ण झाल्याचा आनंद या चित्रपटामधील टीम साजरा करत आहे.

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 1:27 PM IST

मुंबई - Kartik Aaryan :अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी रुपेरी पडद्यावर परतत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून तो या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता, अखेर बुधवारी त्यानं सुटकेचा श्वास घेतला. या चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी त्यानं त्याच्या आवडत्या रसमलाईचा आस्वाद घेतला आहे. कार्तिकनं त्याचा आगामी चित्रपट 'चंदू चॅम्पियन'चे शूटिंग पूर्ण केलं असून त्यानं या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. 'चंदू चॅम्पियन'साठी त्यानं वास्तविक जीवनात खूप बदल केला होता. या चित्रपटासाठी तो एक कठीण डाईट घेत होता.

'चंदू चॅम्पियन' शूटिंग पूर्ण : 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट खेळाडूच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन व्यतिरिक्त कतरिना कैफ, पलक लालवानी, श्रद्धा कपूर, भुवन अरोरा, अडोनिस कपसलिस, राजपाल यादव, विजय राज आणि इतर कलाकार आहेत. 'चंदू चॅम्पियन'चं दिग्दर्शन कबीर खान यांनी केलंय. दरम्यान, कार्तिकनं कबीर खान आणि इतर क्रूसोबतचा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कबीर खान हे कार्तिकला रसमलाईची पूर्ण प्लेट देताना दिसत आहे. सुरुवातीला कार्तिक चकित होतो, यानंतर कबीर खान त्याला रसमलाई भरवतात. याशिवाय या व्हिडिओत कार्तिक कबीर यांना मीठी मारून हसताना दिसतो.

कार्तिक आर्यननं शेअर केली पोस्ट : कार्तिकनं शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "या रासमलाईची चव ही एक विजयाप्रमाणे आहे. शेवटी एका वर्षानंतर साखर खाल्ली, एक वर्षाहून अधिक तयारी आणि जगभरातील 8 महिन्यांच्या दिवस-रात्र शूटिंगनंतर, आज आम्ही 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाच्या शूटिंगचा प्रवास पूर्ण करत आहोत.'' याशिवाय त्यानं कबीर खान यांचे आभार मानले आहे. कार्तिकनं या चित्रपटामधील फर्स्ट लूकमध्ये इंडिया ब्लेझर परिधान केला होता. याशिवाय त्याने आपले केस कमी केले होते, तर त्याच्या चेहऱ्यावर काही किरकोळ दुखापतीच्या खुणा दिसत होत्या. त्यानं नुकतेच इंस्टाग्रामवर सांगितलं होत की, तो या चित्रपटात वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या सेना अगबेकोशी लढणार आहे. कार्तिकनं या चॅम्पियनसोबतचा फोटोही पोस्ट केला होता. 'चंदू चॅम्पियन' चित्रपट 14 जून 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. संजय लीला भन्साळीच्या 'हिरामंडी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित; पाहा व्हिडिओ
  2. अंकिता लोखंडे रणदीप हुड्डासोबत हिंदी चित्रपटसृष्टीत करणार कमबॅक
  3. सेलेब्रिटी क्रिकेट लिग 2024 : संघ, कर्णधार आणि सामन्यांचा संपूर्ण तपशील जाणून घेण्यासाठी वाचा बातमी

ABOUT THE AUTHOR

...view details