शिर्डी - नव्वदच्या दशकात चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयानं ठसा उमटवणारी अभिनेत्री रविना टंडननं आज शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे. रविना साईबाबांची भक्त असून ती अनेकदा दर्शनासाठी शिर्डीत जात असते. दरम्यान रविनाची मुलगी राशा थडानीनं अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत 'आझाद' चित्रपटाद्वारे पदार्पण केलं आहे. तिचा हा चित्रपट 17 जानेवारी रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सध्या हा चित्रपट रुपेरी पडद्यावर विशेष कामगिरी करत नाही. मुलीच्या करिअरसाठी साईबाबांचे आभार मानण्यासाठी रविना टंडननं आज शिर्डीत साईबाबाचं दर्शन घेतलं. साईबाबांच्या दर्शनानंतर रविनाचा, साईबाबा संस्थानच्या प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे यांनी सत्कार केला. यावेळी जनसंपर्क विभागाचे पर्यवेक्षक प्रशांत सुर्यवंशी देखील उपस्थित होते.
रविना टंडननं घेतलं साईबाबाचं दर्शन : साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलतांना रविनानं म्हटलं, "मी साईभक्त असून शिर्डीला लहान असतांना मला वडील घेवून येत होते. त्यावेळपासून मी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येत आहे. माझे वडीलानंतर मी आणि आता माझ्या मुलांनाही साईबाबांच्या दर्शनासाठी घेवून येत असते. साईबाबांना मध्ये मला माझे वडील दिसतात. साईबाबांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहेत. मात्र साईबाबांना मी कधीच काही मागत नाही. साईंनी आपल्याला जिवन दिलं आहे, हातपाय दिलेले आहेत. त्यामुळे मेहनत करून कर्म कमवायचे असते, कर्माने फळ मिळते. मात्र साईबाबांचे आभार मानण्यासाठी साईदरबारी मी नेहमीच येत असते."
'आझाद' चित्रपटाबद्दल : रविना टंडनची मुलगी राशाच्या 'आझाद' चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता अजय देवगणचा भाचा अमन देवगननं मुख्य भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केलं आहे. हा चित्रपट सुमारे 80 कोटीच्या बजेटमध्ये निर्मित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे निर्माते प्रज्ञा यादव, रॉनी स्क्रूवाला हे आहेत. 'आझाद' चित्रपटानं आतापर्यंत रुपेरी पडद्यावर 5.75 कोटीची कमाई केली आहे. मात्र या चित्रपटामधील 'उई अम्मा' या गाण्यामुळे राशाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. तिच हे गाणं खूप हिट झालं आहे.
हेही वाचा :