मुंबई - Kareena Kapoor :अभिनेत्री करीना कपूर, क्रिती सेनॉन आणि तब्बू स्टारर कॉमेडी ड्रामा चित्रपट 'क्रू'नं बॉक्स ऑफिसवर 9 दिवसांपासून दबदबा निर्माण केला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. या चित्रपटानं देशांतर्गत 50 कोटीचा आकडा पार केला आहे. अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ आणि करीना कपूर खान यांच्यातील बॉन्डबद्दल सर्वांनाच माहिती आहे. दोघेही खूप चांगले मित्र आहेत. याशिवाय दिलजीत दोसांझनं करीना कपूर, अक्षय कुमार आणि कियारा अडवाणीबरोबर 'गुड न्यूज' चित्रपटात काम केलंय. 'क्रू' चित्रपटाच्या यशानंतर, करीनानं इंस्टाग्रामवर एक 'आस्क मी एनीथिंग' सत्र आयोजित केला होता.
करीनाचं 'आस्क मी एनीथिंग' सत्र :एका चाहत्यानं करीना कपूरला विचारले, ''क्रू' चित्रपटातील तुझे आवडते गाणे कोणते आहे?'' यानंतर तिनं गाण्यामधील पोस्टर शेअर केले. तिच्या आवडत्या गाण्याबद्दल सांगितलं. याशिवाय या पोस्टमध्ये तिनं ''दिलजीत गर्ल फॉरेव्हर'' असं देखील लिहिलं आहे. करीनाचं 'क्रू' चित्रपटातील आवडत गाणं 'नैना' आहे. यानंतर दुसऱ्या एका चाहत्यानं विचारलं, ''या चित्रपटामध्ये तू जेव्हा 'सोना कितना सोना है' गाणं गायलं, तेव्हा करिश्मा कपूर उर्फ लोलोचे काय रिएक्शन होतं. यावर तिनं सांगितलं की, ''माझ्या बहिणीनं हा चित्रपट 3 वेळा पाहिला. तिला माझे गाणेदेखील आवडले.''