महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

करण ओबेरॉयनं मोना सिंगबरोबरच्या ब्रेकअपबद्दल 18 वर्षांनी केला खुलासा - Karan Oberoi - KARAN OBEROI

Mona singh and Karan Oberoi : अभिनेत्री मोना सिंग आणि अभिनेता करण ओबेरॉय चर्चेत आले आहेत. मोना सिंगबरोबरच्या ब्रेकअपबद्दल करण ओबेरॉयनं आता 18 वर्षांनी खुलासा केला आहे.

Mona singh and Karan Oberoi
मोना सिंग आणि करण ओबेरॉय (instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 11:20 AM IST

मुंबई - Mona singh and Karan Oberoi:'जस्सी जैसी कोई नहीं' या मालिकेमधून घराघरात नाव कमावणारी मोना सिंग सध्या तिच्या 'मुंज्या' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हॉरर कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मोनाचे नाव अभिनेता करण ओबेरॉयशीही जोडलं गेलं होतं. दोघांची पहिली भेट 2006 मध्ये 'जस्सी जैसी कोई नहीं' या मालिकेच्या सेटवर झाली होती. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघेही वेगळे झाले. दोघांनीही ब्रेकअपबद्दल न बोलण्याचा निर्णय घेतला. करण ओबेरॉयनं मोना सिंगबरोबरच्या ब्रेकअपबद्दल आता 18 वर्षांनी उघडपणे सांगितलं आहे.

करण ओबेरॉय आणि मोना सिंगचं ब्रेकअप :करण ओबेरॉयनं सिद्धार्थ काननबरोबरच्या संवाद दरम्यान सांगितलं की, त्याला मोना सिंगशी लग्न करायचं होतं, तरीही मोनानं नातं संपवलं. त्यानं या नात्याबद्दल बोलताना म्हटलं, "जस्सी जैसी कोई नहीं'च्या सेटपासून आमचं प्रेम सुरू झालं होतं. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर खूप वेळ घालवता तेव्हा त्या व्यक्तीबद्दल आसक्ती निर्माण होणं अत्यंत स्वाभाविक आहे. ती एक अप्रतिम अभिनेत्री आहे. ती खूप शांत व्यक्ती आहे. या गोष्टीमुळे मला ती छान वाटली होती. मोनाबद्दल बोलताना करणनं पुढं म्हटलं, "ती मोकळेपणानं हसते आणि मी तिच्या या लूकच्या प्रेमात पडलो. ती एक व्यक्ती म्हणून खूप चांगली होती. काही गोष्टींमुळे तिला वेगळा मार्ग शोधावा लागला, पण याचा अर्थ असा नाही की तुमच्या मनात कोणाबद्दल वाईट भावना आहे."

मोना सिंगनं केलं लग्न : यानंतर त्यानं पुढं सांगितलं, "ही खूप साधी गोष्ट आहे. 'जस्सी जैसी कोई नहीं' हा एक उत्तम शो होता आणि ती त्यावेळी नॅशनल आयकॉन बनली होती. ती करिअरमध्ये पुढे जात होती. त्यावेळी तिनं लग्नास नकार दिला तेव्हा मला ते समजलं नाही, पण आता समजू शकतं. आपल्याला वाईट तेव्हाच वाटतं जेव्हा आपल्याला आपल्यासारखं कुणीतरी हवं असतं. जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टी समजत नाहीत. तिला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं आणि त्यात काहीही चुकीचं नाही." ब्रेकअपनंतर करण मोनाला करण भेटला नाही. मोनानं 2019 मध्ये चित्रपट निर्माता श्याम राजगोपालनशी लग्न केलं. याबद्दल तिनं सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्यांना माहिती दिली होती.

हेही वाचा :

  1. गोळीबार प्रकरणी सलमान आणि अरबाज खानचे पोलिसांनी नोंदवले जबाब - Salman Khans statement
  2. भारताच्या पहिल्या महिला आयपीएस किरण बेदींच्या बायोपिकची घोषणा, या खास दिवशी होणार रिलीज - BIOPIC ON IPS KIRAN BEDI
  3. विजय वर्माने सुरू केले 'मटका किंग'चे शूटिंग, नागराज मंजुळे करतोय दिग्दर्शन - Matka King

ABOUT THE AUTHOR

...view details