मुंबई :बॉलिवूड स्टार शाहरुख खान 'किंग' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या तो 'किंग' या चित्रपटावर काम करत आहे. शाहरुखनं त्याच्या 59व्या वाढदिवशी खुलासा केला होता की, त्यानं 'किंग'साठी त्याचे लांब केस कापले आहेत. दरम्यान, शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. 2023 मध्ये शाहरुखनं बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका केला होता, मात्र 2024 मध्ये त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. आता 2024मध्ये शाहरुख खानचे काही जुने सुपरहिट चित्रपट रि- रिलीज होत आहेत, ज्यात 'करण अर्जुन' ते 'कल हो ना हो' या चित्रपटाचा समावेश आहेत.
करण-अर्जुन :शाहरुख खान आणि सलमान खान स्टारर चित्रपट 'करण-अर्जुन' थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहे. 'करण-अर्जुन'चा ट्रेलर आज 14 नोव्हेंबरला रिलीज करण्यात आला. हा ट्रेलर हृतिक रोशनच्या आवाजात आहे. शाहरुख आणि सलमाननं राकेश रोशनच्या चित्रपटाचा ट्रेलरही शेअर केला आहे. 'करण-अर्जुन' हा 22 नोव्हेंबरला पुन्हा रिलीज होणार आहेत.
कल हो ना हो : 'करण-अर्जुन'च नाही तर शाहरुख खान, सैफ अली खान आणि प्रिती झिंटा स्टारर रोमँटिक चित्रपट 'कल हो ना हो' पुन्हा प्रदर्शित होणार आहे. करण जोहरनं 'कल हो ना हो' या चित्रपटाची निर्मिती केली होती. निखिल अडवाणीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आता 21 वर्षांनंतर शाहरुख खानचा हा चित्रपट 15 नोव्हेंबरला पुन्हा प्रदर्शित होत आहे.