मुंबई - Kangana Ranaut :बॉलिवूड क्वीन कंगना राणौतच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कंगना रणौत बॉलिवूड सोडणार असल्याचं आता समजत आहे. कंगनाबद्दल सर्वांना माहिती आहे की, ती 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप उमेदवार म्हणून तिच्या मूळ गावी हिमाचल प्रदेशातील मंडी या हाय-प्रोफाइल लोकसभा मतदारसंघातून लढत आहे. मंडी मतदारसंघातून तिकीट मिळताच तिनं निवडणूक रॅली करून जनतेला विकासाबद्दल काही सुंदर गोष्टी सांगत, त्यांचे मनं जिंकण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, कंगनाबद्दल असं बोललं जात आहे की, लोकसभा निवडणूक जिंकताच ती ग्लॅमरस दुनियेला म्हणजे बी-टाऊनला टाटा बाय बाय करेल.
'क्वीन' कंगना बॉलिवूडपासून होणार दूर :कंगना रणौतनं आपल्या ताज्या निवडणूक रॅलीत मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याशी स्वतःची तुलना केली आहे. कंगना राणौत म्हटलं होत की, "अमिताभ बच्चन यांच्यानंतर जर लोकांना कोणता स्टार सर्वात जास्त आवडत असेल तर ते मी आहे." या रॅलीमध्ये तिनं 2024 च्या लोकसभा निवडणूकबद्दल भाष्य केलं. तिनं म्हटलं, जर ती या निवडणुकीत विजयी झाली तर ती चित्रपटसृष्टी सोडेल. दरम्यान रिपोर्टनुसार सिनेसृष्टी सोडण्यामागचे कारण म्हणजे, खासदार झाल्यानंतर ती आपला परिसर आणि लोकांच्या विकासासाठी काम करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. याशिवाय ती पूर्णपणे आपला वेळ जनतेसाठी देऊ शकेल.