मुंबई - Kalki 2898 OTT Release and Rights : साऊथ सिनेसृष्टीतील स्टार प्रभास अभिनीत 'कल्की 2898 एडी' उद्या 27 जून रोजी जगभरातील बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज आहे. प्रभासचे चाहते या चित्रपटाच्या रिलीजची वाट अनेक दिवसांपासून पाहात होते. आता अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'कल्की 2898 एडी'नं भारत आणि परदेशात आगाऊ बुकिंग करून करोडो रुपयांचा गल्ला जमा केला आहे. 'कल्की 2898 एडी'नं आगाऊ बुकिंगमध्ये रेकॉर्डब्रेक तिकिटे विकत आहेत. दरम्यान उत्तर अमेरिकेत, 'कल्की 2898 एडी'नं आगाऊ बुकिंगच्या प्री-सेल्समध्ये 3 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. दरम्यान 'कल्की 2898 एडी'चे ओटीटी हक्क विकले गेले असल्याचं समजत आहे.
'कल्की 2898 एडी'चं ओटीटी हक्क :रिपोर्ट्सनुसार, 'कल्की 2898 एडी'चे ओटीटी हक्क दोन आघाडीचे प्लॅटफॉर्म अमेजन प्राईम आणि नेटफ्लिक्सनं विकत घेतले आहेत. नेटफ्लिक्सनं हिंदी व्हर्जनचे राइट्स 175 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. तसेच दुसरीकडे ॲमेझॉन प्राईमनं 200 कोटी रुपयांना साऊथमधील भाषांचे राइट्स विकत घेतले आहेत. मात्र निर्मात्यांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. 600 कोटी रुपयांच्या प्रचंड बजेटमध्ये बनवलेल्या 'कल्की 2898 एडी'नं ओटीटी हक्कांमधून एकूण 375 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची आतापर्यत ओटीटी रिलीजची तारीख जाहीर झालेली नाही.