मुंबई -Kalki 2898 AD New Poster :साऊथ सुपरस्टार प्रभास स्टारर 'कल्की एडी 2898' या चित्रपटाची वाट अनेकजण आतुरतेने पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा रोमांचक टीझर प्रदर्शित करण्यात आला. अमिताभ बच्चन साकारत असलेली 'अश्वत्थाम्या'ची व्यक्तिरेखा हे या चित्रपटाचं प्रमुख आकर्षण आहे. बच्चनला या नव्या अवतारात पाहण्यासाठी स्वाभाविकपणे त्याचे चाहते आतुर झाले आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की एडी 2898' या चित्रपटात अमिताभ बच्चनसह प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हासन आणि दिशा पटानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 26 एप्रिल रोजी संध्याकाळी, 'कल्की एडी 2898' च्या निर्मात्यांनी एक टीझर रिलीज केला होता, ज्यामध्ये त्यांनी एक मोठी घोषणा करण्याचे आश्वासन दिलं होतं.
'कल्की एडी 2898' चित्रपटाबद्दल होणार आज घोषणा : 'कल्की एडी 2898' या चित्रपटाबद्दल आज संध्याकाळी 5 वाजता एक मोठी अपडेट येणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक नवीन पोस्टर रिलीज केलं आहे. एक मुखवटा घातलेला माणूस हातात शस्त्र घेऊन उभा आहे आणि त्याच्या वर एक एक विशेष डिझाईन असलेलं गोल चिन्ह आहे. पोस्टरची ही रचनाच चित्रपटाबद्दलचं कुतुहल वाढवण्याचं काम करतेय. हॉलीवूडपट आवडीने पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी हे चिन्ह नवं नाही. शेअर झालेल्या सदर पोस्टरवरची, 'फायनल काउंटडाउन, आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाहा.' ही वाक्यं चित्रपटाचं वेगळेपण ठसवण्याचा प्रयत्न करतायत, हे नक्की. चित्रपट निर्माते नाग अश्विन यांनी आगामी सायन्स फिक्शन 'कल्की 2898 एडी'ची घोषणा केल्यापासून हा चित्रपट खूप चर्चेत होता.