महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज सुरूवात, पाहा कमाई - kalki 2898 ad box office day 1 - KALKI 2898 AD BOX OFFICE DAY 1

Kalki 2898 AD Box Office Day 1: 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड नोटा छापत आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 3 वाजेपर्यंत किती कमाई केली याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Kalki 2898 AD Box Office Day 1
कल्कि 2898 एडी बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1 (कल्कि 2898 एडी (IMAGE- vyjayanthimovies))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 4:09 PM IST

मुंबई - Kalki 2898 AD Box Office Day 1:'कल्की 2898 एडी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणार आहे. हा चित्रपट आज 27 जून रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं परदेशातही धुमाकूळ घातला आहे. 'कल्की 2898 एडी'नं आतापर्यंत 20 लाख आगाऊ तिकिटे विकून 50 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत तेलंगणातील 'कल्की 2898 एडी'चे जवळपास सर्व शो हाऊसफुल्ल चालू आहेत. संध्याकाळचे शो सुरू होण्यापूर्वी दुपारी 3 वाजेपर्यंत 'कल्की 2898 एडी'नं किती कलेक्शन केले ते जाणून घेऊया.

दुपारी 3 वाजेपर्यंत एवढी कमाई :सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'कल्की 2898 एडी'नं दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व भाषांमध्ये 38.3 कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे. या चित्रपटानं ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 55 कोटींचा व्यवसाय केला आहे. संध्याकाळच्या शोमध्ये हा चित्रपट चांगलीच कमाई करेल अस सध्या दिसत आहे. 'कल्की 2898 एडी'नं ॲडव्हान्स बुकिंगमधून भारतात एकूण 55 कोटी रुपये कमावले आहेत. यात तेलुगु व्हर्जनमध्ये आगाऊ बुकिंगमध्ये 44 कोटींचा व्यवसाय केला आहे. तेलूगु व्यतिरिक्त, 'कल्की 2898 एडी' हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये देखील रिलीज झाला आहे. मात्र सर्वाधिक कमाई तेलुगू व्हर्जनमध्ये झाली आहे. तेलुगूतील 2,586 शो चालू आहेत. त्यापैकी 1,871 शो हाऊसफुल्ल आहेत.

अमेरिकेत केली 'इतकी' कमाई :आंध्र प्रदेशमध्ये 3,188 शो आहेत, त्यापैकी 2,100 शो हाऊसफुल्ल आहेत. हिंदीमध्ये कमाईचा आकडा 8.6 कोटी आहे. दिल्लीमध्ये 14 टक्के ऑक्युपन्सी रेट आहे आणि 1,322 शो पैकी 72 शो हाऊसफुल्ल चालू आहेत. महाराष्ट्रातील चित्रपटाच्या 2,836 शो पैकी 143 शो हाऊसफुल्ल आहेत. या चित्रपटानं उत्तर अमेरिकेत प्री-सेल्समध्ये 31 कोटीची कमावले आहेत. हा चित्रपट आजच्या सुरुवातीच्या कमाईसह खाली दिलेल्या या चित्रपटांच्या देशांतर्गत आणि जागतिक ओपनिंग कलेक्शनचे रेकॉर्ड तोडणार असल्याचं दिसत आहे.

देशांतर्गत टॉप ओपनिंग (हिंदी-साऊथ चित्रपट)

जवान (65.5 कोटी) ओपनिंग, 582.21 कोटी

ABOUT THE AUTHOR

...view details