मुंबई - Kalki 2898 AD Weekend Collection :'कल्की 2898 एडी' देश आणि जगभरात बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करत आहे. हा चित्रपट 27 जून रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज झाला. या चित्रपटानं चार दिवसात जगभरात 500 कोटी रुपये आणि देशांतर्गत 100 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. आता 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी आज 1 जुलै रोजी चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडच्या कमाईचे अधिकृत आकडे शेअर केले आहेत. या चित्रपटानं पहिल्या वीकेंडमध्ये प्रचंड कमाई केली आहे.
'कल्की 2898 एडी'नं केली बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई : या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर देशांतर्गंत एकूण कमाई 115 कोटी झाली आहे. 'कल्की 2898 एडी'नं पहिल्या वीकेंडमध्ये जगभरात 555 कोटींचा गल्ला जमवला. उत्तर अमेरिकेतील ॲडव्हान्स बुकिंगचे रेकॉर्ड मोडले होते. 'कल्की 2898 एडी'नं 11 मिलियन यूएस डॉलर्स या देशात (90 कोटी) कमावले आहेत. आज 1 जुलै रोजी प्रभासचा हा चित्रपट सोमवारी किती कमाई करेल हे पाहणं लक्षणीय असेल. 'कल्की 2898 एडी' या चित्रपटानं चार दिवसात अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 10 दिवसात 1000 कोटी कमाई करेल असे अनेकजण पोस्ट शेअर करून सांगताना दिसत आहेत. सध्या प्रभासच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे.