महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कल्की ढेपाळला... बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दुसऱ्या वीकेंडनंतर घसरण - Kalki 2898 AD - KALKI 2898 AD

Kalki 2898 AD Box Office Collection Day 13: दुसऱ्या वीकेंडनंतर 'कल्की 2898 एडी'च्या कलेक्शनमध्ये घट झाली आहे. गेल्या सोमवारनंतर मंगळवारीही प्रभासचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकला नाही.

Kalki 2898 AD Box Office Collection Day 13
कल्की 2898 एडी बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 13 ((IMAGE- MOVIE POSTER (vyjayanthimovies))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 10, 2024, 4:41 PM IST

मुंबई - Kalki 2898 AD Collection Day 13 : नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' या चित्रपटानं भारतात 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. चांगली सुरुवात केल्यानंतर आता प्रभास स्टारर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण होत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं देशांर्तगत एकूण 529.25 कोटींची कमाई केली आहे.'कल्की 2898 एडी' चित्रपटानं रिलीजच्या दुसऱ्या सोमवारी कमाई 10.4 कोटी रुपयांची कमाई केली होती. रिलीजच्या 13व्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत घसरण झाल्यानंतर, हा चित्रपट 1000 कोटीचा आकडा पार करणार की नाही याबद्दल आता शंका निर्माण होत आहे.

'कल्की 2898 एडी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन :या चित्रपटानं 13व्या दिवशी रुपेरी पडद्यावर 8.8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'कल्की 2898 एडी'नं, तेलुगू आवृत्तीमधून 250.25 कोटी रुपये, हिंदीमधून 224.65 कोटी रुपये, तामिळमधून 31 कोटी रुपये आणि कन्नडमधून 4.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याशिवाय मल्याळम व्हर्जननं 19.3 कोटी रुपये कमवले आहेत. प्रभासचा हा चित्रपट जगभरात 1,000 कोटींचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, मात्र हा आकडा गाठण्यासाठी आता खूप प्रयत्न करावा लागणार आहे. निर्मात्यांनी 8 जुलै 2024 रोजी चित्रपटाच्या परदेशातील कलेक्शनची माहिती शेवटची शेअर केली होती. गेल्या सोमवारी प्रसिद्ध झालेल्या आकड्यानुसार 'कल्की 2889 एडी'नं 900 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला.

'कल्की 2898 एडी'मधील स्टार्सच्या भूमिका : 8 जुलैनंतर या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबाबत निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान 'कल्की 2898 एडी' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटामधील प्रभास दीपिका, पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी यांची भूमिका अनेकांना आवडत आहे. 'कल्की 2898 एडी' चित्रपटामध्ये दीपिकानं सुमती , प्रभासनं भैरव , दिशानं रॉक्सी आणि अमिताभ बच्चननं अश्वत्थामाच्या भूमिका केली आहे. याशिवाय कमल हासन या चित्रपट खलनायकाच्या भूमिकेत आहे. त्यांची ही भूमिका देखील चाहत्यांना खूप आवडत आहे.

हेही वाचा :

  1. 'सराफिरा'च्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये चमकले स्टार्स, व्हिडिओ व्हायरल - Akshay Kumar
  2. "चित्रपटात एक कोंबडी जरी दाखवली तरी..." निर्मात्यानं झाडावर चढून आंदोलन करत 'हे' केले आरोप - Producer Praveen Kumar
  3. एल्विश यादव सापडला अडचणीत, ईडीनं बजावला नवीन समन्स - EVISH YADAV

ABOUT THE AUTHOR

...view details