मुंबई - Kalki 2898AD :चित्रपट निर्माता नाग अश्विन यांचा आगामी 'कल्की 2898 एडी'बद्दल एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचे निर्माते आज एक मोठी घोषणा करण्याची योजना आखत आहेत, ज्यामुळे प्रत्येकजण थक्क होईल. या आश्वासनासह बिग बींचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यावर 'वेळ आली आहे' असं लिहिलं आहे. या पोस्टरमध्ये अमिताभ हा पूर्णपणे बँडेज आणि कपड्याने झाकलेले दिसत आहेत. त्याचे फक्त डोळे आणि केस दिसत आहेत. यामध्ये त्याचा चेहरा दाखविण्यात आलेला नाही. दरम्यान या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी विशेष भूमिकेत आहेत.
'कल्की 2898 एडी'विषयी मोठी अपडेट : या चित्रपटाकडून काही मोठे अपडेट्स अपेक्षित आहेत. आज निर्माते चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज तारखेची घोषणा देखील करू शकतात. निर्माते आज संध्याकाळी 7.15 वाजता चाहत्यांना एक सुखद धक्का देणार आहे. दरम्यान वैजयंती मूव्हीज निर्मित असलेला 'कल्की 2898 एडी बहुभाषिक चित्रपट आहे. चित्रपट निर्माते नाग अश्विन यांनी आगामी सायन्स फिक्शन 'कल्की 2898 एडी'ची घोषणा केल्यापासून प्रभासचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटामध्ये प्रभास हा अॅक्शनमोडमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 600 कोटीमध्ये तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाकडून प्रभासला खूप अपेक्षा आहेत.