महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'जोकर 2'च्या ट्रेलर रिलीजची प्रतीक्षा संपली, जोक्विन आणि लेडी गागाचे नवीन पोस्टर जारी - Joker 2 sequel - JOKER 2 SEQUEL

Joker 2 sequel : 'जोकर २' च्या ट्रेलरची प्रतीक्षा जवळपास संपली आहे. निर्मात्यांनी 9 एप्रिल रोजी ट्रेलरचे लॉन्चिंगची तयारी केली आहे. जोकीन फिनिक्स आणि लेडी गागा यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे नवीन पोस्टर जारी करण्यात आलंय. 'जोकर 2' हा या वर्षीच्या हॉलिवूडच्या बहुप्रतिक्षित रिलीजपैकी एक आहे.

Joker 2 sequel
'जोकर 2'च्या ट्रेलर रिलीजची प्रतीक्षा संपली

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 5:36 PM IST

मुंबई - Joker 2 sequel : आगामी 'जोकर 2' चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले असून वॉर्नर ब्रदर्सने ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या चित्रपटाच्या अमाप यशानंतर 4 ऑक्टोबर पासून याच्या रिलीजची प्रतीक्षा सुरू होती. अखेर 'जोकर 2' चित्रपटाचा ट्रेलर 9 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

निर्मात्यांनी शेअर केलेल्या नवीन पोस्टरमध्ये जोक्विन फिनिक्स हा आर्थर फ्लेक म्हणून जोकरच्या भूमिकेत दिसत आहे. लेडी गागा हिनं यामध्ये जोकरच्या हार्ले क्विन या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. दोघेही पोस्टरमध्ये साध्या पोशाखात क्लासिक बॉलरूम नृत्य पोज देताना दिसत आहे.

पहिल्या चित्रपटात जोकरच्या भूमिकेसाठी ऑस्कर जिंकणारा जोकीन फिनिक्स त्याच्या भूमिकेसाठी परत येत आहे, तर लेडी गागा हार्ले क्विनपासून प्रेरित भूमिकेसाठी कलाकारांमध्ये सामील होत आहे. द हँगओव्हर मालिका, ड्यू डेट आणि वॉर डॉग्स यांसारख्या चित्रपटांमधील कामासाठी प्रसिद्ध असलेल्या टॉड फिलिप्सने मूळ कथेसह डीसी कॉमिक्सच्या पात्राला नवीन जीवन दिलं जे ब्लॉकबस्टर हिट ठरलंय.

मूळ चित्रपट आर्थर फ्लेकच्या एका अयशस्वी विदूषकापासून गुन्हेगारापर्यंतच्या प्रवासाचा फॉलोअप आहे. लेडी गागाने या चित्रपटामध्ये तिची स्टार पॉवर जोडून सिक्वेलला गाण्यासह आणखी उंचीवर नेलं आहे. या सिक्वेलमध्ये 15 कव्हर गाणी समाविष्ट असतील आणि 200 दशलक्ष डॉलर्स इतके मोठे बजेट या चित्रपटाचं असेल.

'जोकर 2' मध्ये सोफीच्या भूमिकेत पुन्हा दिसणारी झॅझी बीट्झचा विश्वास आहे की सिक्वेलसाठी संगीताच्या स्वरूपात बदल करणं हे एकदम योग्य आहे. एका मुलाखतीत तिनं म्हटलंय की, "मी आर्थरला बघू शकते, तो खूप काही अनुभवत आहे, त्याबद्दल नाचत आहे आणि गातो आहे. तो जोकर आहे, त्यामुळे मला वाटते की ते माझ्यासाठी अर्थपूर्ण आहे."

हेही वाचा -

  1. केएल राहुल आणि अथिया शेट्टी खरोखरच होणार का पालक? सत्य आलं बाहेर... - ATHIYA SHETTY AND KL RAHUL
  2. 'शैतान'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; निर्मात्यांनी शेअर केली पोस्ट - ajay devgan shaitaan
  3. 'किल'चा टीझर लवकरच होणार प्रदर्शित; करण जोहरनं शेअर केली पोस्ट - kill teaser out soon

ABOUT THE AUTHOR

...view details