महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अनंत-राधिकाच्या लग्नात शाहरुख खानला भेटून जॉन सीना झाला रोमांचित, केली पोस्ट शेअर - John cena and shahrukh khan - JOHN CENA AND SHAHRUKH KHAN

John cena and shahrukh khan : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात शाहरुख खानला भेटून जॉन सीना हा खूप आनंदी झाला आहे. आता त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपला आनंद व्यक्त केला आहे.

John cena and  shahrukh khan
जॉन सीना आणि शाहरुख खान (John Cenas - X)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 3:29 PM IST

मुंबई - John cena and shahrukh khan : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी 12 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये लग्न केलं. अनंत आणि राधिकाच्या भव्य लग्नानंतर, अंबानी कुटुंबानं या जोडप्यासाठी शुभ आशीर्वाद समारंभाचे आयोजन केले होते. यामध्ये काही धार्मिक विधी झाल्या. यावेळी बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील स्टार्स देखील उपस्थित होते. तसेच राजकारण,क्रिडा आणि औद्योगिक जगतातील दिग्गजांनीही हजेरी लावली होती. अनंत आणि राधिकाच्या लग्नाला सुपरस्टार शाहरुख खान आणि जॉन सीना यांनीही देखील उपस्थित होते.

जॉन सीनानं शेअर केली पोस्ट :लग्नादरम्यान बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खानला भेटल्यानंतर जॉन सीना हा उत्साहित झाला होता. किंग खानला भेटल्याचा आनंद त्यानं सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. जॉन सीनानं शाहरुखबरोबरचा फोटो शेअर केला आहे. जॉन सीनानं शनिवारी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करत लिहिलं, "एक अतिवास्तव 24 तास. अतुलनीय प्रेमळपणा आणि आदरातिथ्याबद्दल अंबानी कुटुंबाचे आभारी आहे. अनेक अविस्मरणीय क्षणांनी भरलेला एक अनुभव, ज्यानं मला शाहरुख खानला प्रत्यक्ष भेटणे यासह असंख्य नवीन मित्रांशी संपर्क साधायला मिळाला. त्याचा माझ्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला आहे."

अनंत आणि राधिकाच्या लग्नाचं आज होईल रिसेप्शन :अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात जॉन सीनानं निळा कुर्ता, पांढरा पायजमा आणि तपकिरी शूज घातले होते. भारतीय पारंपारिक लूकमध्ये तो खूपच सुंदर दिसत होता. शाहरुख ऑलिव्ह ग्रीन कलरच्या पठाणी कुर्ता-पायजमामध्ये होता. अभिनेता आणि माजी डब्लूडब्लूई चॅम्पियन जॉन सीनानं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात येऊन, त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्टार्सनं अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबर खूप धमाल केली. आज 14 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये देखील अनेक स्टार्स दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. अनंत अंबानींच्या लग्नाला नयनताराची हजेरी, कॅप्टन कूलसह साक्षीबरोबरचा फोटो केला शेअर - NAYANTHARA NEWS
  2. अनंत अंबानींकडून शाहरूखसह खास मित्रांना महागड्या घड्याळाची भेट, किंमत जाणून तुम्हाला बसेल धक्का - Anant Radhika Wedding
  3. अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा विवाह लावणाऱ्या पंडितानं घेतली 'इतकी' दक्षिणा - Anant Radhika Wedding

ABOUT THE AUTHOR

...view details