मुंबई - Jasmin Bhasin Cornea Damage : टीव्ही अभिनेत्री आणि अली गोनीची गर्लफ्रेंड जास्मिन भसीन सध्या कठीण परिस्थितून जात आहे. काही दिवसांपूर्वी एका इव्हेंटमध्ये जास्मिनला लेन्समुळे डोळ्यांच्या काही समस्यांचा सामना करावा लागला होता. यानंतर डोळ्याला जास्त वेदना होऊ लागल्यानं तिला तातडीनं डॉक्टरांकडे नेण्यात आलं. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं की, तिचा कॉर्निया खराब झाला आहे. बरे होण्यासाठी किमान 4 ते 5 दिवस लागतील. जस्मिनला उपचारानंतर डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली आहे. आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जस्मिन भसीनचा डोळ्याला झाली इजा, डोळ्यावर पट्टी बांधलेला फोटो व्हायरल - Jasmin Bhasin - JASMIN BHASIN
Jasmin Bhasin Cornea Damage: टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती डोळ्यावर पट्टी बांधलेली दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, जस्मिनच्या डोळ्यांच्या कॉर्नियाला इजा झाली आहे.
Published : Jul 21, 2024, 5:22 PM IST
जस्मिन भसीनचे कॉर्निया झाले खराब : या फोटोमध्ये तिच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली दिसत आहेत. एका मीडिया मुलाखतीत जास्मिननं तिच्याबरोबर घडलेली घटना शेअर केली. तिनं सांगितलं की, "मी 17 जुलैला एका कार्यक्रमासाठी दिल्लीत होते, या कार्यक्रमात मी तयारी करत होते. माझ्या लेन्समध्ये काय चूक झाली हे मला माहित नाही, परंतु ते घातल्यानंतर माझे डोळे दुखू लागले. ही वेदना हळूहळू वाढत गेली. मला डॉक्टरांकडे जायचे होते, हा कार्यक्रम कॉन्ट्रॅक्टवर होता, म्हणून मी आधी कार्यक्रमध्ये उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आणि नंतर डॉक्टरकडे जायचे ठरवले."
जास्मिन भसीनचे फोटो व्हायरल :यानंतर तिनं पुढं सांगितलं, "मी कार्यक्रमात सनग्लासेस घातले होते आणि टीम मला सांभाळण्यात मदत करत होती. एक क्षण असा आला की मला काहीच दिसत नव्हते. कार्यक्रमानंतर मी आईज स्पेशलिस्टकडे गेले. त्यांनी मला सांगितलं की माझ्या कॉर्नियाला नुकसान झालंय. यानंतर काही वेळ न घालवता त्यांनी लगेच माझ्या डोळ्यांवर उपचार केला. माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली. दुसऱ्या दिवशी मी मुंबईला गेले. इथे देखील माझ्यावर उपचार सुरू आहेत. माझ्यासाठी हे सोपे नाही, कारण यामुळे मला बघता येत नाही आणि वेदनांमुळे मला झोपायलाही त्रास होत आहे. सुदैवानं मला माझे कोणतेही काम पुढे ढकलण्याची गरज नाही. मला आशा आहे की मी काही दिवसात बरी होईल आणि कामावर परत येईल." काही दिवसांपूर्वीच जास्मिन तिच्या बॉयफ्रेंड अली गोनीला सपोर्ट करण्यासाठी एका शोमध्ये गेली होती. यावेळी ती शोमध्ये स्वयंपाक करताना दिसली होती.