मुंबई Janhvi Kapoor :बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तसेच या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर राजकुमार राव देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच करण जोहरला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीनं तिच्या बालपणीचा मोठा खुलासा केला आहे. जान्हवीनं वयाच्या 12 आणि 13 व्या वर्षी फोटो अडल्ट साईटवर पोस्ट केल्याबद्दल खुलासा केला आहे. करण जोहरशी बोलताना तिनं म्हटलं, "जेव्हा मला पहिल्यांदा कळलं की हे सर्व मीडियानं केलं आहे, तेव्हा मला वाटते की मी 12-13 वर्षांची होती. मी आई बाबांबरोबर एका कार्यक्रमाला गेली होती, तिथे माझे काही फोटो काढण्यात आले होते. यानंतर हे फोटो अडल्ट साईटवर पोस्ट करण्यात आली. त्यामुळे माझ्या शाळेतील मुलं आणि मुली माझ्यावर हसत होते."
जान्हवी कपूरनं केला खुलासा :जान्हवी कपूरनं पुढं सांगितलं, "या सगळ्याला सामोरे जाणं खूप कठीण आहे. हा खूप वाईट अनुभव होता. जान्हवी कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट 31 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' या चित्रपटामध्ये एका पती आणि पत्नीची सुंदर प्रेमकहाणी दाखवली जाणार आहे. दरम्यान 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही'मधील 'देखा तेनू' हे पहिलं गाणं लॉन्च करण्यात आलं होतं. हे गाणं अनेकांना आवडलं आहे.