महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'जय हनुमान'चा फर्स्ट लूक लवकर होईल प्रदर्शित, प्रशांत वर्मानं 'पुष्पा'च्या निर्मात्यांशी केली हातमिळवणी - JAI HANUMAN MOVIE

'हनु-मॅन'चा भाग 2 हा लवकरच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर 'जय हनुमान'चा फर्स्ट लूक येत आहे.

jai hanuman
जय हनुमान (Etv Bharat (Etv Bharat))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 29, 2024, 5:38 PM IST

मुंबई -साऊथ सिनेसृष्टीतील 'हनु-मॅन'चा भाग 2 'जय हनुमान'च्या प्रतीक्षेत असलेल्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर 'जय हनुमान'चा चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज 29 ऑक्टोबर रोजी 'जय हनुमान'चे दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी याबद्दल खुलासा केला आहे. 'जय हनुमान' चित्रपटाच्या निर्माते मैत्री मुव्ही मेकर्स आणि 'पुष्पा' चित्रपटाचे निर्माते यांच्याशी हातमिळवणी केली आहे. आज 'जय हनुमान'च्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांना याची माहिती दिली आहे. बजरंगबलीचे पोस्टरही शेअर त्यांनी एक घोषणा केली आहे.

'जय हनुमान'चा फर्स्ट लूक उद्या येईल : 'जय हनुमान' या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिलं आहे की, 'ही दिवाळी, शौर्याची ज्योत पुन्हा प्रज्वलित करणारी आहे आणि आपल्या भारतीय इतिहासाचा सम्मान करणारी आहे, मैत्री ऑफिशियस प्रशांत वर्माच्या 'जय हनुमान' या महाकाव्य चित्रपटासाठी हातमिळवणी करत आहे. 'जय हनुमान'चा फर्स्ट लूक या दिवाळीच्या संध्याकाळी समोर येत आहे.' या चित्रपटाला नवीन येर्ननी, वाई शंकर, प्रशांत वर्मा बनवत आहेत.

'हनु मॅन' चित्रपटानं केला होता धमाका : चालू वर्षाच्या 12 जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला 'हनु-मॅन' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटामध्ये साऊथ स्टार तेजा सज्जा दिसला होता. 'हनु मॅन' हा फक्त 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता, जो चालू वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे. या चित्रपटानं जगभरात 350 कोटीची कमाई केली होती. हा चित्रपट अनेकांना पसंत पडला होता. 'हनु-मॅन' चित्रपटामध्ये तेजा सज्जाशिवाय वरलक्ष्मी सरथकुमार, वेनेला किशोर, सत्या, गेटअप श्रीनू, विनय राय, अमृता एअर आणि इतर कलाकार दिसले होते. हा चित्रपट आता देखील ओटीटीवर गाजत आहे. या चित्रपटामध्ये तेजा सज्जाचे जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स दाखविण्यात आले आहेत. याशिवाय या चित्रपटामधील व्हिएफएक्स देखील खूप आकर्षक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details