मुंबई - Shah Rukh khan : हिंदी चित्रपटसृष्टीचा बादशाह शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच झालेल्या झी सिने अवॉर्ड्समध्ये शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. या चित्रपटानं झी सिने अवॉर्ड्समध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत. दरम्यान झी सिने अवॉर्ड्सच्या कार्यक्रमात शाहरुख खाननं स्टेजवर असं काही बोलले, ज्यामुळे अनेक स्टार्स दुखावले जाऊ शकतात. शाहरुख खाननं झी सिने अवॉर्ड्सच्या मंचावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारताना आत्मविश्वासानं सांगितलं की, ''हा संदेश माझा मुलगा आर्यन, मुलगी सुहाना, माझी पत्नी गौरी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे, जब तक तुम्हारा बाप जिंदा है एंटरटेनमेंट जिंदा है.''
शाहरुख खान व्हिडिओ व्हायरल :आता किंग खानच्या या भाषामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. काहीजण शाहरुख कौतुक करत आहेत. याशिवाय काहीजण त्याच्यावर टीका देखील करताना दिसत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, ''हाच खरा किंग खान आहे.'' दुसऱ्या चाहत्यानं लिहिलंय, ''बॉलिवूडचा शेवटचा सुपरस्टार.'' आणखी एक चाहता लिहिल, ''मला भीती वाटते की तुझ्यानंतर बॉलिवूडचे काय होईल.'' अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. दुसरीकडे, एका यूजर्सनं त्याला ट्रोल करत म्हटलं, ''इतका जास्त गर्व करायला नाही पाहिजे.''