मुंबई - Friendship Day 2024: मैत्री हे एक असं नातं आहे, जे तुम्ही स्वतः तयार करता. बाकीची नाती आपोआप तयार होतात, जसे आई-वडील, भाऊ-बहीण आणि नवरा-बायकोची जोडीही नशिबावर अवलंबून असते. पण मैत्री हे एक नातं आहे जे तुम्ही स्वतः निवडू शकता. फ्रेंडशिप डे आज 4 ऑगस्ट रोजी साजरा केला जात आहे. हा दिवस सर्वांसाठीचं खूप महत्वाचा आहे. मैत्रीचं नात हे सर्वासाठी खूप विशेष आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनले आहेत, जे मैत्रीवर आधारित आहे. या विशेष दिवशी आम्ही तुमच्यासाठी काही निवडक चित्रपट घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर आज पाहून हा सुंदर दिवस साजरा करू शकता.
'जाने तू...या जाने ना' (2008) : 'जाने तू...या जाने ना' हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल. या चित्रपटामध्ये जय आणि अदितीमध्ये घट्ट मैत्रीचं नात दाखविण्यात आलं आहे. यानंतर दोघे कसे प्रेमात पडतात हे खूप विशेष पद्धतीनं मांडलं गेलं आहे. इमरान खान आणि जेनेलिया डिसूझा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील प्रत्येक सीन तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
'ये जवानी है दिवानी' (2013) :2013मध्ये रिलीज झालेला अयान मुखर्जीचा 'ये जवानी है दिवानी' हा चित्रपट खूप उत्तम आहे. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आणि कल्की कोचलिन आणि आदित्य रॉय कपूर यांच्याबरोबरची त्यांची बॉन्डिंग खूप लोकप्रिय झाली आहे. या फ्रेंडशिप डेवर, तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.