महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

स्वातंत्र्यदिन विशेष : हृतिक रोशन ते सिद्धार्थ मल्होत्रापर्यंत 'या' स्टार्सनं जवानाची भूमिका साकारून जिंकलं प्रेक्षकांचं मन - Independence Day 2024

Independence Day 2024 : दरवर्षी बॉक्स ऑफिसवर देशभक्तीपर चित्रपट रिलीज होतात. आतापर्यंत अनेक देशभक्तीपर चित्रपट पडद्यावर रिलीज झाले आहेत, काही चित्रपटामधील भारतीय जवानाची भूमिका साकारून स्टार्सनं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. पाहूयात यातीलच काही गाजलेल्या चित्रपटांचा आढावा.

Independence Day 2024
स्वातंत्र्य दिन 2024 ((ETV Bharat))

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 13, 2024, 4:07 PM IST

मुंबई - Independence Day 2024 :हिंदी चित्रपटसृष्टीत वर्षभरात अनेक चित्रपट तयार होतात. मात्र देशभक्तीपर चित्रपट हे मनाला भिडणारे असतात. आपल्याला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली, पण आजही स्वातंत्र्य आणि देशभक्तीपर बनवलेले चित्रपट लोकांना आवडतात. हे चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्यात यशस्वी ठरतात. देशभक्तीपर चित्रपट प्रेक्षकांच्या भावनांना हात घालणारे असतात. अनेक स्टार्सनं देशभक्तीपर बनलेल्या चित्रपटांमध्ये काम केलय. त्यांनी केलेल्या भूमिका देखील प्रेक्षकांना आवडतात. चला जाणून घेऊया त्या बॉलिवूड कलाकारांबद्दल ज्यांना पडद्यावर देशभक्त म्हणून खूप पसंत केलं गेलं.

अक्षय कुमार :बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक प्रकारचे चित्रपट केले आहेत. त्याला देशभक्तीशी संबंधित चित्रपटांची वेगळीच ओढ आहे. त्यानं स्वत: अनेकवेळा सांगितलं आहे की, जेव्हा तो सैन्याचा गणवेश घालतो, तेव्हा त्याच्यामध्ये एक वेगळाच उत्साह येतो. अक्षयनं 'एअरलिफ्ट', 'हॉलिडे ए सोल्जर इन नेव्हर ऑफ ड्यूटी', 'रुस्तम', 'बेबी', 'गोल्ड', 'नाम शबाना', 'केसरी', 'गब्बर इज बॅक', 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

हृतिक रोशन : लष्कराच्या गणवेशात उत्तम दिसणाऱ्या नायकांमध्ये हृतिक रोशनचाही समावेश होतो. भारतीय जवानाच्या भूमिकेत चाहत्यांना तो खूप आवडतो. हृतिकही त्याच्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकण्यात यशस्वी होतो. स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासत्ताक दिन, लोक अजूनही हृतिक रोशनचा 'लक्ष्य' टेलिव्हिजनवर पाहतात. याशिवाय हृतिकचा नुकताच प्रदर्शित झालेला 'फायटर' हा चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटात त्यानं समशेर पठानियाची भूमिका साकारली होती.

सनी देओल :देशभक्तीवर आधारित अनेक चित्रपटांमध्ये सनी देओल दिसला आहे. आजही त्याचा 'बॉर्डर' प्रेक्षकांना खूप आवडतो. सनी देओलचा स्क्रीन प्रेझेन्स देशभक्तीची भावना जागी करण्यासाठी पुरेसा आहे. 'बॉर्डर' व्यतिरिक्त तो, 'गदर एक प्रेम कथा', 'इंडियन', 'माँ तुझे सलाम', 'द हिरो लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय', 'शहीद' आणि नुकताच प्रदर्शित झालेला 'गदर 2' या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये दिसला आहे.

विकी कौशल :बॉलिवूड अभिनेता विकी कौशलनं आपल्या कारकिर्दीत काही देशभक्तीपर चित्रपट केले आहेत. चित्रपटांमधील त्याच्या दमदार अभिनयामुळे त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रेक्षकांना त्याला भारतीय जवानाच्या गणवेशात अधिक बघायचे आहे. 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'मधील दमदार कामगिरीनं त्यानं सर्वांची मनं जिंकली. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'सॅम बहादूर'चं समीक्षक आणि प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं होतं.

सिद्धार्थ मल्होत्रा :देशभक्ताच्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्राचेही खूप कौतुक झाले आहे. तो पहिल्यांदा 'अय्यारी'मध्ये दिसला होता. यात त्यानं मेजर जय बक्षीची भूमिका केली होती. त्यानंतर त्यानं 'शेरशाह' केला. यामध्ये त्यानं कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याचं खूप कौतुक झालं आहे. यामध्ये त्यानं कियारा अडवाणीबरोबर स्क्रीन शेअर केली होती. याशिवाय तो 'मिशन मजनू'मध्ये देखील दिसला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details