मुंबई :टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची कथित गर्लफ्रेंड जास्मिन वालियामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रविवारी, 23 फेब्रुवारी रोजी दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याला जास्मिन उपस्थित राहिली. याशिवाय हा सामना सुरू असताना तिनं टीम इंडियाला सपोर्ट केला. आता जस्मिनच्या उपस्थितीमुळे ती हार्दिक पांड्याला डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र या दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याला अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही. भारत आणि पाकिस्तानमधील सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी दुबईत आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पोहोचले होते. आता सोशल मीडियावर या सामान्यामधील काही फोटो व्हायरल होत आहेत.
हार्दिक पांड्याची कथित गर्लफ्रेंड :सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याची कथित गर्लफ्रेंड जास्मिन वालिया कॅमेऱ्यात कैद झाली. स्टँडमध्ये बसून असलेल्या जास्मिन वालियानं पांढरा स्लीव्हलेस टॉप घातला होता. याशिवाय तिनं एक सुंदर काळा चष्मा घातला होता. ती तिच्या मैत्रिणींबरोबर व्हीआयपी स्टँडवर बसून कॅमेऱ्याला पाहूण फ्लाइंग किस देताना दिसली. आता जास्मिनच्या उपस्थितीमुळे हार्दिक आणि तिच्या नात्याबद्दल सोशल मीडियाच्या चर्चा होत आहेत. जास्मिननं यापूर्वी इतर सामने देखील पाहिले आहेत. हार्दिक आणि जास्मिन यांच्यात डेटिंगच्या अफवा ऑगस्ट 2024पासून सुरू झाल्या होत्या.