महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

विव्हियन त्याच्या माजी पत्नीचा छळ करत होता, सारा खानच्या दाव्यानं बिग बॉसमध्ये खळबळ - SARA KHAN AND VIVIAN DCENA

विव्हियन डिसेना माजी पत्नी वाहबिजला किती छळत होता याचं गॉसिपिंग करण्याचा प्रयत्न सारा खाननं केला. यामुळे ती आणि विव्हियन यांच्यातील नातं अधिक दूरावल्याचं स्पष्ट झालंय.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 6, 2024, 10:28 AM IST

मुंबई - 'बिग बॉस 18' च्या घरामध्ये मतभेद होणं काही नवीन नाही. काही खासगी गोष्टींचीही चर्चा इथं होत असते आणि त्यावरुन एकमेकांबद्दलची मतभेद आणखी वाढीस लागतात. अशीच घटना घडली आहे सारा खान आणि विव्हियन डिसेना यांच्याबाबतीत. सारानं गप्पांच्या ओघात विव्हियनची पूर्वीची पत्नी वाहबिज दोराबजी हिनं केलेल्या खुलाशांचा उल्लेख केला. विव्हियन त्याची माजी पत्नी वाहबिजला कसा त्रास देत होता याबद्दल सांगितलं. त्यामुळे विव्हियन आणि सारा यांच्यातील संबंध दूरावले आहेत हे स्पष्ट जाणवतं.

बिग बॉसच्या घरामध्ये सारा अरफीन खान बंडखोरी करण्याच्या मूडमध्ये दिसली. विव्हियनच्या विरोधात ईशा सिंग, अविनाश मिश्रा आणि एलिस कौशिक यांच्यासह घरातील अनेक सदस्य गेले आहेत. सर्वांनीच अविनाशवर पक्षपाती करत असल्याचा आरोप केला होता. सारा हिनं अविनाशला आपला दीर म्हटलं होतं ती देखील त्याच्या विरोधात गेलेली दिसली.

'बिग बॉस 18' च्या लेटेस्ट भागामध्ये सारा अरफीन खाननं विव्हियनच्या खासगी गोष्टींबद्दल सांगितलं. ती म्हणाली की, 'विव्हियनची माजी पत्नी वाहबिजनं तो आपल्याशी कसा वागतो याबद्दल सांगितलं होतं. हा व्यक्ती तिला किती त्रास देतो याविषयीही ती माझ्याशी बोलली होती.'

लिव्हिंग एरियामध्ये बसून विव्हियनबद्दल चर्चा करत असताना सारा खाननं शिल्पा शिरोडकरला सांगितलं की, "मुझे वाहबिज ने कहा था इसकी एक्स कैसा इंसान है और उनको कितना तंग किया था.. विवियन ने, मैं नहीं मानी. ." हे ऐकून शिल्पा लगेच सावध झाली आणि तिला बोलताना रोखलं. अशा गोष्टी या घरात बोलायची परवानगी नसल्याचं तिनं साराला सांगितलं. या गोष्टी समजून घेण्यात काडी इतकाही रस नसल्याचं शिल्पा म्हणाली. तिच्या शेजारी बसलेल्या अरफीननंही आपल्या पत्नीला विव्हियनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि पत्नीबद्दल बोलण्यापासून रोखलं. तरीही साराच्या चेहऱ्यावर आपण चुकलोय असा भाव नव्हता.

सारानं यापूर्वी विव्हियनबद्दल अविनाश बरोबरही असंच बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अविनाश आणि विव्हियनचे संबंध चांगले असल्यामुळे त्यानं साराचं काही ऐकून घेतलं नाही. नॉमिनेशनच्या वेळीही विव्हियननं सारा आणि अरफीनचं नाव घेतलं होतं. त्यामुळेही सारा आणि विव्हियनमधील नातं ताणलं होतं. हे साराला आवडलं नाही आणि म्हणूनच ती शिल्पाला त्याच्या खासगी आयुष्यातील गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत होती. बिग बॉसच्या घरातील नाती ही किती कमजोर असू शकतात याचं उदाहरण पुन्हा एकदा या शोमध्ये पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details