महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

इब्राहिम अली खाननं इंस्टाग्रामवर केलं पदार्पण, एकाच पोस्टसह झाले 5 लाख 81 हजार फॉलोअर्स - ibrahim ali khan debut on instagram - IBRAHIM ALI KHAN DEBUT ON INSTAGRAM

Ibrahim Ali Khan on Instagram : इब्राहिम अली खाननं इंस्टाग्रामवर अकाउंट तयार केलं आहे. त्याचे फार कमी वेळात 5 लाख 81 हजार फॉलोअर्स झाले आहेत.

Ibrahim Ali Khan on Instagramt
इब्राहिम अली खाननं केलं इंस्टाग्रामवर आगमन

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 8:50 PM IST

मुंबई - Ibrahim Ali Khan on Instagram : बॉलिवूड स्टार सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. इब्राहिमनं आज 30 एप्रिल रोजी इंस्टाग्राम अकाउंट तयार केलं आहे. 29 एप्रिल रोजी, जेव्हा पापाराझीनं त्याला विचारलं की तो इंस्टाग्रामवर का नाही? तेव्हा इब्राहिमनं त्याच्या संपूर्ण योजनेबद्दल त्यांना सांगितलं. आता त्यानं त्यांच्या योजनेनुसार, इंस्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. इब्राहिम त्याच्या पहिल्या पोस्टमध्ये एका जाहिरातीचे फोटोशूट करताना दिसत आहे. एवढेच नाही तर त्याची कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री पलक तिवारीसह त्यानं अनेक सेलिब्रिटींना फॉलो केलं आहे.

इब्राहिम अली इन्स्टाग्राम अकाउंट :आता इन्स्टाग्रामवर त्यानं फक्त 42 सेलिब्रिटींना फॉलो केलं आहे. याशिवाय खूप कमी वेळात त्याचे 5 लाख 81 हजार फॉलोअर्स झाले आहेत. यामध्ये त्याची कथित गर्लफ्रेंड पलक तिवारी, आलिया भट्ट, जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया, जावेद जाफरीची मुलगी अलविया जाफरी, सलमान खानची भाची अलिझेह, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा, टायगर रोहित शेट्टी, फरहान अख्तर, कपूर, खुशी कपूर, करीना कपूर खान, रणवीर सिंग, बहीण सारा अली खान, करण जोहर, अनन्या पांडे, कुणाल खेमू, मलायका अरोराचा मुलगा अरहान खान, काकू सोहा अली खान, सुहाना खान हे आहेत.

इब्राहिम अली खान प्रोजेक्ट : इब्राहिम अली खान आजकाल त्याच्या 'सरजमीन' या डेब्यू चित्रपटामुळे चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनवला जात आहे. 'सरजमीन' चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटाद्वारे बोमन इराणीचा मुलगा कयोजही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इब्राहिम लवकरच त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या चित्रपटाची माहिती देऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय तो 'नादानियां' या चित्रपटामध्ये खुशी कपूरबरोबर दिसणार आहे. सध्या या चित्रपटाबद्दल कुठलीही घोषणा झालेली नाही.

हेही वाचा :

  1. नीतू कपूर आणि राकेश रोशननं जुना फोटो शेअर करून ऋषी कपूरच्या आठवणींना दिला उजाळा - rishi kapoor 4th death anniversary
  2. धनुष आणि रश्मिका मंदान्नाच्या 'कुबेर' अपडेटने सोशल मीडियावर धमाल - Kuber update
  3. 'द लायन किंग'चा प्रीक्वल 'मुफासा: द लायन किंग'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - mufasa the lion king trailer out

ABOUT THE AUTHOR

...view details