महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

हुमा कुरेशीनं शेअर केला 'बयान'च्या शूटिंग सेटवरील फोटो - Huma Qureshi - HUMA QURESHI

Huma Qureshi : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीनं तिच्या आगामी 'बयान' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Huma Qureshi
हुमा कुरेशी (Huma Qureshi Instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 5:25 PM IST

मुंबई - Huma Qureshi : 'गँग्स ऑफ वासेपूर', 'लव शव ते चिकन खुराना', 'बदलापूर' आणि 'मोनिका, ओ माय डार्लिंग'मध्ये दिसलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशीनं तिच्या आगामी 'बयान' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात ती पोलीस अधिकारी रुही करतारची भूमिका साकारताना दिसणार आहे. मंगळवारी तिच्या इंस्टाग्रामवर 'बयान'च्या सेटवरील एक फोटो पोस्ट केला.

फोटोमध्ये, कॉर्पोरेट फॉर्मल्स परिधान केलेली हुमा कुरेशी कक्षाच्या बाहेर उभी आहे आणि तिच्या हातात क्लॅप बोर्ड आहे. यामध्ये ती तिचा सनग्लासेस अ‍ॅडजस्ट करताना दिसत आहे. क्लॅप बोर्डवर सीन क्रमांक 21, शॉट क्रमांक 3 लिहिलेला दिसत आहे. कॅप्शनमध्ये हुमाने लिहिले की, 'रुही करतार ड्युटीसाठी रिपोर्टिंग करत आहे.' या चित्रपटाविषयी बोलताना हुमा म्हणाली की, "'बयान' चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाची सुरुवात हा एक अद्भुत अनुभव होता. आमची दृष्टी प्रत्यक्षात येताना पाहणं हा एक थरारक अनुभव आहे. सेटवरची ऊर्जा खूप चांगली आहे आणि संपूर्ण टीम खरोखरच प्रेरणादायी आहे, मला चित्रपटाची स्क्रिप्ट खूप आवडली आहे."

जॉली एलएलबी ३ मध्ये दिसणार हुमा कुरेशी

अभिनेत्री हुमा पुढे म्हणाली, 'बयान' चित्रपटाची कथा प्रत्येकाला आपली वाटू शकेल. अलिकडेच हुमानं 'जॉली एलएलबी 3' हा चित्रपट पूर्ण केला आहे. यामध्ये अक्षय कुमार, अर्शद वारसी, अमृता राव आणि सौरभ शुक्ला यांच्याही भूमिका आहेत.

हुमा कुरेशी वर्कफ्रंट

हुमा कुरेशी आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत खूप सुंदर चित्रपट दिले आहेत. आता ती पुन्हा एकदा पडद्यावर जादू करायला सज्ज झाली आहे. ती गुलाबी या चित्रपटातही काम करत आहे. हा चित्रपट एका धाडसी महिला ऑटो-रिक्षा चालकाच्या सत्यकथेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये एक महिला रोजच्या जीवनामध्ये किती संघर्ष करते हे दाखविण्यात येणार आहे. जिओ स्टुडिओ आणि एकेलॉन प्रॉडक्शन प्रस्तुत 'गुलाबी' चित्रपटाचे दिग्दर्शन विपुल मेहता आणि ज्योती देशपांडे आणि विशाल राणा यांनी केलं आहे. हुमाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती तिच्या 'महाराणी 3' या लोकप्रिय वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरीजमधील तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. या वेब सीरीजच्या मागील दोन सीझनमध्ये हुमाही दमदार स्टाईलमध्ये दिसली होती. 'महाराणी' वेब सीरीज ही सोनी लिव्हवर प्रदर्शित झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details