मुंबई : सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटानं तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. वीकेंडमध्येही या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन सध्या चेंगराचेंगरीप्रकरणी अनेक अडचणींना तोंड देत आहे. 'पुष्पा 2: द रुल'नं बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2'नं तिसऱ्या रविवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1060 कोटींचा आकडा पार केला आहे. 'पुष्पा 2: द रुल'नं तिसऱ्या शनिवारी सर्व भाषांमध्ये सुमारे 24.75 कोटी रुपयांचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. याशिवाय रविवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली.
'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : अल्लू अर्जुनच्या चित्रपटानं 18व्या दिवशी 33.25 कोटींची कमाई केली, यानंतर भारतातील 'पुष्पा 2'ची एकूण कमाई 1062.9 कोटी रुपये झाली आहे. यासह 'पुष्पा 2' हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'बाहुबली 2'चा विक्रम मोडल्यानंतर हा चित्रपट लवकरच 'दंगल'ला मागे टाकण्याच्या तयारीमध्ये आहे. 'पुष्पा 2' हा चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवर 700 कोटींच्या जवळ पोहोचला आहे. 'पुष्पा 2' चित्रपट इतर भाषांपेक्षा हिंदी भाषेत उत्तम कामगिरी करत आहे. तिसऱ्या शुक्रवारपर्यंत या चित्रपटानं हिंदी भाषेत एकूण 654 कोटीचा व्यवसाय केला होता. याशिवाय सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 17व्या आणि 18व्या दिवशी अनुक्रमे 20 कोटी आणि 26.75 कोटींचा या चित्रपटानं व्यवसाय केला आहे.
चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनची माफी : 'पुष्पा 2'नं भारतात 18 दिवसांमध्ये एकूण 691.75 कोटी रुपये कमावले आहे. दरम्यान वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी स्टारर 'बेबी जॉन' हा चित्रपट येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट 'पुष्पा 2'ला टक्कर बॉक्स ऑफिसवर देईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन कॅलिस यांनी केलंय. याशिवाय 'बेबी जॉन'ची निर्मिती अॅटली करत आहे. दरम्यान 'पुष्पा 2' येत्या काळात बॉक्स ऑफिसवर 2000 कोटीचा आकडा पार करू शकणार की नाही हे पाहणे आता लक्षणीय ठरणार आहे. तसेच सध्या अल्लू अर्जुनचे तेलंगणा सरकारशी शब्दयुद्ध सुरू आहे. यापूर्वी अल्लू अर्जुननं एक पत्रकार परिषेद घेतली होती. यात त्यानं चेंगराचेंगरीप्रकरणी माफी देखील मागितली होती.
हेही वाचा :